मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
नागरिकांची सनद
शासकीय सुट्टया २०१३
  
जिल्हा परिषदेचे, पंचायत समित्यांचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये
  

नियम 100 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये

पोटकलम (2) खालील वेळोवेळी सुधारण्यात येणा-या पहिल्या अनुसूचिमध्ये (जिचा या अधिनियमात जिल्हा यादी असा उल्लेख केला आहे.) नमूद केलेल्या विषयांपैकी सर्व किंवा कोणत्याही विषयांच्या संबंधात जिल्हा परिषदेच्या स्वाधीन करण्यात आलेल्या जिल्हा निधीतून जेथवर तरतूद करता येणे शक्य असेल तेथवर जिल्हयामध्ये वाजवी तरतूद करणे आणि जिल्हयात अशा कोणत्याही विषयाशी संबंधीत असलेली कामे किंवा विकास परियोजना अंमलात आणणे किंवा ती सुस्थितीत ठेवणे हे जिल्हा परिषदेचे कर्तव्य असेल.

नियम 106 जिल्हा परिषदेचे अधिकार व तिची कार्ये

हा अधिनियम आणि त्या खालील राज्य शासनाने केलेले नियम यांच्या तरतुदींच्या अधीनतेने जिल्हा परिषदेस

  • या अधिनियमान्वये किंवा त्याखाली तिच्यावर लादण्यात आलेली कार्ये व कर्तव्ये योग्यरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करता येतील.

  • जिल्हयातील कामे किंवा विकास परीयोजना यांना ( या अधिनियमान्वये गटातील ज्या कोणत्याही कामांच्या किंवा विकास परियोजनांच्या संबधात गट अनुदानातून मंजुरी देण्याचे अधिकार पंचायत समितीस देण्यात आले आहेत अशी कामे आणि विकास परियोजना नसलेली ) मंजूरी देता येईल.

  • कोणत्याही वेळी स्थायी समितीचा किंवा कोणत्याही विषय समितीचा कोणताही कामकाज वृतांत किंवा तिला नेमून दिलेल्या कोणत्याही विषयाबद्दलचे किंवा त्याच्याशी संबंधि असलेले कोणतेही विरणपत्र हिशेब ठेवून अहवाल मागवता येतील.

  • आपल्या अधिका-यांपैकी व कर्मचा-यांपैकी कोणत्याही अधिका-यास किंवा कर्मचा-यास जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेस हजर राहण्यास आणि असा अधिकारी किंवा कर्मचारी ज्या विभागात काम करीत असेल त्या विभागाशी संबंधित असलेल्या कोणत्याही बाबींवर त्यास सल्ला देण्यास फर्माविता येईल आणि असा प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचारी अशा आदेशाचे पालन करील.

  • या अधिनियमान्वये किंवा त्याखाली जे अधिकार व जी कार्ये पंचायत समितीकडे किंवा स्थायी समितीकडे किंवा विषय समितीकडे किंवा पीठासीन प्राधिका-याकडे किंवा जिल्हा परिषदेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या निय्ांत्राखालील कोणत्याही अधिका-याकडे किंवा कर्मचा-याकडे स्पष्टपणे प्रदान करण्यात आलेली नाहीत किंवा त्यांच्यावर लादण्यात आलेली नाहीत. अशा बाबीसंबंधातील अधिकाराचा वापर करता येईल व कार्ये पार पाडता येतील.

  • कलम 261 पोटकलम (1) खालील कोणत्याही सूचना दिलेल्या असल्यास किंवा कोणतेही निदेश काढलेले असल्यास त्याच्या अधीनतेने स्थायी समितीने विषय समितिने पीठासीन प्राधिका-याने किंवा जिल्हा परिषदेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखालील अधिका-याने घेतलेल्या कोणत्याही निर्णयात सुधारणा करता येईल किंवा त्यात फेरबदल करता येईल.

  • जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखालील असलेले अधिकारपद धारण करणा-या अधिका-यांवर व कर्मचा-यांवर प्रशासनिक नियंत्रण ठेवता येईल आणि

  • या अधिनियमाखालील सर्व कर्तव्ये व कार्ये अंमलबजावणीवर पर्यवेक्षण करता येईल.

नियम 108 पंचायत समितीचे अधिकार व तिची कार्ये

या अधिनियमाच्या किंवा त्याखाली ज्या शासनाने केलेल्या नियमांच्या तरतुदींच्या अधीनतेने प्रत्येक पंचायत समिती

  • जिल्हा परिषदेस आपल्या विकास योजना तयार करता याव्यात म्हणून गटात हाती घ्यावयाच्या कामाचा व विकास परियोजनांचा एक संपूर्ण आराखडा तयार करील.

  • गटातील स्थानिक साधनसंप्पत्तीचा शक्यतोवर जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने गट अनुदानातून हाती घ्यावयाच्या कामांचा व विकास परियोजनांचा एक आराखडा तयार करील.