ग्रामपंचायत विभाग
विभाग प्रंमुख
पदनाम:उपमुख्य् कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि.प.धुळे
ईमेल आयडी:-dy.ceo.vpzpdhule@gmail.com
दुरध्वनी क्रमांक: 02562-237472
प्रस्तावना:
73 व्या घटनादुरूस्तीनुसार ग्रामपंचायतींना घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने व त्यांची आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी याकरीता केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना ग्रामपंचायत विभाग,जिल्हापरिषदेमार्फत राबविल्या जातात.धुळे जिल्हयात एकुण 04 पंचायत समिती व एकुण 557 ग्रामपंचायती आहेत.ग्रामपंचायतींची लोकसंख्या एकुण 14,79,826 आहे अनुसुचित जातीची लोकसंख्या 82,299 एवढी असून अनुसुचित जमातीची लोकसंख्या 6,07,824 एवढी आहे.ग्रामीण भागाच्या क्षेत्रंफळाचा विचार केल्यास 7078.33 चौ.किमी. एवढे आहे.
ध्येय:
बळकट पंचायत राज व्यवस्थेमार्फत सर्व समावेशक व चिरस्थायी ग्रामविकास साधणे.
कार्यदृष्टी:
i.पंचायत राज संस्थांचे सक्षमीकरण करणे.
ii.नियोजन,अमंलबजावणी,व्यवस्थापन व नियंत्रणासाठी पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण
iii.शासनाचे इतर विभाग ,निमशासकीय संस्था,स्वयंसेवी संस्था यांच्या कार्यक्रम व कार्याचा कृतीसंगम
iv.एकत्रित निर्णय,तक्रार निवारण्यासाठी ग्रामसभेव्दारे सामाजिक अंकेक्षण
उद्येश:
i.लोकप्रतिनिधींच्या प्रशिक्षणातून पंचायत राज व्यवस्था बळकट करणे.
ii.गावात मुलभूत सोई सुविधा पुरविणे.
iii.तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मुलभूत साधने व सुविधा पुरविणे.
iv.ग्रामसभेची प्रंभावी अमंलबजावणी करणे.
v.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अमंलबजावणी करून दारिद्रय निर्मुलन करणे.
100 दिवसांचे उदिष्टये:
i. ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणे- एकुण 557 ग्रामपंचायती
ii. लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण- 4949
iii.पंचायत Learning Center स्थापन करणे – 03
कार्यालयाचा पत्ता
ग्रामपंचायत विभाग, मुख्यालय इमारत,तळमजला जिल्हा परिषद,धुळे
स्टेट बॅकेसमोर,धुळे पिन नं.424001
कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक :02562-237472
कार्यालयाचा ईमेल आयडी:-dy.ceo.vpzpdhule@gmail.com
कार्यालयीन कामकाजाची वेळ
कार्यालयीन कामकाजाची वेळ- सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15
अ.क्रं. | पदनाम | विभाग | पत्ता |
---|---|---|---|
1 |
सहायक जनमाहिती अधिकारी |
कनिष्ठ प्रशासन अधिकारी |
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 02562-237472 |
2 |
जनमाहिती अधिकारी |
सहायक गट विकास अधिकारी |
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 02562-237472 |
3 |
प्रथम अपिलीय अधिकारी |
उपमुख्य कार्यकारी अधिकारी |
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 02562-237472 |
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब फेब्रुवारी-16 2019
ग्रामविकास विभाग अधिसुचना दिनांक 12 फेब्रुवारी-2019
अनुसुची
अ.क्र | सेवा | सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) | पदनिर्देशित अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी | द्वितीय अपिलीय अधिकारी |
---|---|---|---|---|---|
१ | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | ग्रामसेवक | सहायक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |
२ | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | ग्रामसेवक | सहायक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |
३ | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | ग्रामसेवक | सहायक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |
४ | दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | सहायक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी | उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) |
५ | ग्रामपंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला | ५ दिवस | ग्रामसेवक | सहायक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |
६ | नमुना 8 चा उतारा | ५ दिवस | ग्रामसेवक | सहायक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |
७ | निराधार असल्याचा दाखला | २० दिवस | ग्रामसेवक | सहायक गट विकास अधिकारी | गट विकास अधिकारी |