बंद

    प्राथमिक शिक्षण विभाग

    विभाग प्रमुख

    नाव            :-  डॉ. किरण जयप्रकाश कुंवर

    पदनाम      :- शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, धुळे

    ईमेल पत्ता  :- edupridhule@gmail.com

    पत्ता            :- मुख्य इमारत जिल्हा परिषद, धुळे 424 001

    फोन नंबर  :- 02562-299268

     

    प्रस्तावना:-

             धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्गत इयता 1 ते 8 वी च्या मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येते. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे विभाग प्रमुख असुन तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हे तालुक्याचे विभाग प्रमुख असतात. इयता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केंद्रशासन पुरस्कृत व राज्यशासन पुरस्कृत अशा विविध योजना राबविल्या जातात.

    विभागाचे ध्येय:-

    1.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वंये ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.

    2.विदयार्थ्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविणे. उदा.मिशन उत्कर्ष अंतर्गत अध्ययनस्तर निश्चिती, उपचारात्मक अध्ययन, अध्यापन (शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन शाळास्तर व FLN जिल्हास्तरावर

    3.जिल्हा परिषद संचलित सर्व प्राथमिक शाळांना भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे

    4.दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साधने (Digital Clasroom)  व तंत्रज्ञ उपलब्ध करुन देणे.

    5.विदयार्थ्यांच्या बौध्दिक शारीरिक दृष्टया सक्षम होण्यासाठी विविध स्पर्धांचे नियोजन व आयोजन  करणे.

    उद्ष्टिे आणि कार्ये:-

    शिक्षण समितीच्या बैठका वेळोवेळी घेण्याची तरतूद आहे. या बैठकीच्या कामकाजात शिक्षण समितीमधील सर्व जिल्हा परिषद सदस्य सहभागी होतात.या बैठकीचे आयोजन शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षण समितीच्या सभेसाठी विषय पत्रिकेची सूचना सभेच्या 10 दिवस आधी पावली जाते. सभेचे इतिवृत्त माननीय अध्यक्ष, शिक्षण समिती यांच्या मान्यतेने घेतले जाते आणि अंतिम केले जाते आणि सर्व सन्माननीय सदस्यांना पाठवले जाते.

    विभाग रचना:-

    Primary_edu

    कर्मचारी व त्यांचे पदनिहाय कर्तव्य
    अ.क्र. पदनाम सोपविण्यात आलेले कामकाज
    1 सहा. प्रशासन अधिकारी पर्यवेक्षिय कामकाज, कार्यालयातील प्रशासकीय कामकाजांवर नियंत्रण ठेवणे,  कार्यालयातील कार्यासनांकडून येणाऱ्या नस्त्यांवर अभिप्राय नोंदविणे. ऑडीट पॉईट निकाली काढणे, ई-ऑफीस अद्यावत करणे, रोज ई-मेल पाहणे, सर्व कर्मचा-यांचे कार्यविवरण नोंदवही गोषावारे तपासणी करणे. कर्मचा-यांची दप्तर तपासणी करणे, विभाग प्रमुख नसतांना अभ्यागंताना वेळ देणे, आपले सरकार पोर्टल व पी.जी. पोर्टल वर यावर कर्मचा-यांकडून कार्यवाही करून घेणे. खासदार/आमदार/पदधिकारी व अधिकारी यांचे व्हि.सी व बैठकांची माहिती विभाग प्रमुखांना देणे.
    2 कनि. प्रशासन अधिकारी
    3 कनि.प्रशासन अधिकारी
    4 कनिष्ठ लेखाधिकारी शिक्षण विभागातील लेखा विषयक संपूर्ण कामकाज, पंचायत राज, महालेखाकार व स्थानिक निधी लेखाचे मुद्दे संबधित कर्मचा-यांकडून निकाली काढून घेणे.
    5 वरिष्ठ सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रपमुख व विस्तार अधिकारी यांच्या सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे व 12 वर्ष / 24 वर्ष चटापाध्याय वेतन श्रेणी मंजूर करणे. या संवर्गातील बदल्यांचे सर्व  कामकाज करणे.  या संवर्गाचे पदोन्नतीचे कामकाज.
    6 वरिष्ठ सहाय्यक खाजगी प्राथमिक शाळा आस्थापना विषयक कामकाज,  स्वयंअर्थ सहाय्यित शाळा, प्रथम मान्यता व नुतनीकरण, नैसर्गिक वाढ इ.  आरटीई मान्यता प्रमाणपत्र,  खाजगी शाळेचे वैद्यकीय देयके, संच मान्यता, खाजगी प्राथमिक शाळांच्या तक्रारी, खाजगी प्राथमिक शाळांचे अंपग प्रस्तावावर कार्यावाही करणे. संच मान्यतेनुसार खाजगी शिक्षकांचे समायोजनाची कार्यवाही.
    7 वरिष्ठ सहाय्यक जिल्हयातील से.नि. प्रा.शि/ पदो. मुख्या/ वि.अ. शि/ के.प्र.यांचे गट विमा मंजुर करणे बाबत कामकाज,  शिक्षकांचे अपंग वाहन भत्ते व अपंग कर्मचा-यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपलब्ध करणे. लोकशाही दिन,
    8. वरिष्ठ सहाय्यक मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व श्रीम. वानखेडे यांना सांगितलेले आढावा बैठकीचे माहिती तयार करणे, ऑनलाईन सर्व माहिती संकेतस्थळावराचे कामकाज इ. टिईटी परीक्षेचे कामकाज व शिष्यवृत्ती परीक्षेचे  कामकाज
    शिक्षण विभागातील चौकशीचे कामकाज करणे.,इतर अनुषंगिक कामकाज,
    9 वरिष्ठ सहाय्यक आस्था 1 जिल्हयाची शिक्षक आस्थापना,  अपंग युनिट बाबतचे कामकाज, जि.प. शिक्षकांची संच मान्यतेनुसार समायोजनानुसार कार्यवाही करणे. पेसा अंतर्गत शिक्षक कंत्राटी/मानधनावर नियुक्ती कार्यवाही, अपंग विशेष शिक्षक (विशेष शिक्षक समोयोजन).
    10 वरिष्ठ सहाय्यक वर्ग 3 व 4 कर्मचा-यांचे आस्थापना सर्व कामकाज,  संपूर्ण न्यायालयीन कामकाज. इतर अनुषंगिक कामकाज,
    11 वरिष्ठ सहाय्यक प्राथमिक शिक्षक/मुख्याध्यापक/केंद्र प्रमुख/विस्तार अधिकारी यांचे सुधारित सेवानिवृत्ती वेतन संबंधीचे कामकाज, सेवानिवृत्त होणा-या शिक्षकाना सेवानिवृत्त आदेश व नोटीस देणे. सर्व प्रा.शि यांचे 12 वर्ष / 24 वर्ष चटोपाध्याय यांचे सेवानिवृत्त कर्मचारी यांचे चटोपाध्याय वेतनश्रेणी मंजूर करणे.
    12
    13 वरिष्ठ सहाय्यक माहिती अधिकार 1 ते 17 मुद्दे, नागरीकांची सनद, सेवा हमी कायदा, झिरो पेन्डसी अहवाल साप्रवि कडे सादर करणे, आपले सरकार पोर्टलवरील ऑनलाईन तक्रार निवारण, आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया व प्रतिपुर्ती, श्रीम.देवयानी कुवर यांना मदतनीस
    14 कनि.सहाय्यक शिक्षण विभागातील संपूर्ण वैद्यकीय देयके प्रतिपूर्ती
    आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत ऑनलाईन प्राथमिक शिक्षक बदलीचे कामकाज, आमदार व खासदार निधी कामकाज., राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान व यशवंत पंचायत राज अभियानाचे कामकाज इ. सर्व संवर्गाची बिंदू नामावली चे कामकाज, श्रीम. रणदिवे यांना मदतनीस
    15 कनिष्ठ सहाय्यक वर्ग-1 व वर्ग-2 अधिकारी यांची आस्थापना विषयक कामे,
    कार्यालयातील सर्व कर्मचा-यांचे वेतन देयके तयार करणे  सेवार्थ  लेवल-2 चे संपूर्ण कामकाज, प्राथमिक शिक्षकांचे वेतन देयके, निवृत्तीवेतन देयके तयार करणे व इतर लाभांचे देयके अदा करणे, अतिरीक्त कार्यभार रोखपाल, सर्व संवर्गाची उच्च शिक्षणाची /परीक्षा परवानगी देणे इ. शिक्षक संघटनेचे तक्रारीचे कामकाज.
    16 कनिष्ठ सहाय्यक जावक शाखेचे कामकाज, प्रति स्वाक्षरी, कनिष्ठ लेखाधिकारी यांना मदतनीस, दिर्घ मुदतीचे रजा प्रकरणे मंजूरीबाबत कार्यवाही. शाळा निर्लेखन,
    17 कनिष्ठ सहाय्यक शालेय पोषण आहार योजनेचे संपूर्ण कामकाज, PRC व शासन स्तरावरून येणा-या सर्व समितीची माहिती तयार करणे सादर करणे, वार्षिक प्रशासन अहवाल बाबत कामकाज.
    18 कनिष्ठ सहाय्यक आवक शाखेचे संपूर्ण कामकाज, तारांकीत -अतारांकीत, लक्षवेधी, लोकआयुक्त, RTS/RTI, आमदार-खासदार, पदधिकारी  इ. नोंदवहीचे कामकाज इ. व इतर अनुषंगिक कामकाज
    19 कनिष्ठ सहाय्यक विद्यार्थी यांचे  नावात, जात, जन्मदिनांक, आडनाव बदल करणे व शिक्षकांचे नावात बदल करणे. 5 सप्टेबर आदर्श शिक्षक पुरस्कार,संपूर्ण कामकाज  इ. लोक आयुक्त प्रकरणे बाबतची कार्यवाही करणे, प्रिऑडीट, ठेव संलग्न विमा योजना इ. RFD/KRA चे कामकाज,  मा. लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांच्या मासिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. शिक्षणाधिकारी यांचे संभाव्य व मासिक दैनदिनी तयार करणे.
    NPS/DCPS योजनेचे संबधित कामकाज.
    20 कनि. सहा (लेखा) नियोजन शाखेचे संपूर्ण कामकाज, विभागीय आयुक्त तपासणी मुद्दे व संपूर्ण कार्यवाही,  शिक्षण समिती सभा,
    21 वरिष्ठ सहाय्यक जयंती/ पुण्यतिथी कामकाज,टीईटी व शिष्यवृत्ती परीक्षेचे कामकाज,  टीईटी प्रमाणपत्र वाटप,  सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना, भांडारपाल, सेवानिवृत्त होणारे प्राथमिक शिक्षक/मुख्याध्यापक/केंद्र प्रमुख/विस्तार अधिकारी यांचे प्रस्ताव मागणी व सेवानिवृत्ती वेतन संबंधीचे काय्रवाही प्रस्तावित करणे, कोविड-19 अंतर्गत मयत प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव शासनास सादर करणे.

     

    माहिती अधिकारी अधिनियम -2005
    सहा. जन माहिती अधिकारी संबधित कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यक
    जनमाहिती अधिकारी मा.श्री. संजीव विभांडिक

    प्र.उपशिक्षणाधिकारी

    (अल्पसंख्यांक शाळा व गुणवत्तेबाबत अर्ज)

    मा.श्री. सुशीलकुमार चांदोडे

    कार्यालयीन अधिक्षक

    (सेवेतील लाभाबाबत अर्ज)

    मा.श्री. जी.के.साळुंके,

    सहाय्यक कार्यक्रम अधिकारी

    (समग्र शिक्षा अभियान संबधित अर्ज)

    अर्ज प्राप्त झाल्यापासून 30 दिवसात माहिती देणे आवश्यक
    प्रथम अपिलीय अधिकारी मा.डॉ.किरण कुंवर

    शिक्षणाधिकारी (प्राथ.)

    जन माहिती अर्जावरील कार्यवाही प्राप्त झाल्यापासून 30 दिवसात आत अर्ज करणे आवश्यक
    द्वितीय अपिलीय अधिकारी मा. आयुक्त राज्य माहिती आयोग , खंडपीठ नाशिक प्रथम अपिलाचा निर्णय झाल्यापासून 90 दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक