बंद

    महिला व बाल कल्याण विभाग

    प्रस्तावना :-

    धुळे जिल्हा परिषदेअंतर्गत एकुण 10 प्रकल्प कार्यरत आहेत. सदर प्रकल्पांतर्गत 2024 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत किशोरी मुली, गरोदर महिला, स्तनदा माता, 0 ते 6 वयोगटातील बालके यातील पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात येतो.

    एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील सेवा

    1. 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण आहार विषयक आरोग्य विषयक दर्जा सुधारणे.
    2. मुलांच्या योग्य मानसिक, शारिरिक सामाजिक विकासासाठीचा पाया घालणे.
    3. बालमृत्यु, मुलांचा रोगटपणा, कुपोषण शाळेची गळती यांचे प्रमाण कमी करणे.
    4. मातांना पोषक आहार आणि आरेाग्य शिक्षण देऊन मुलांचे सर्वसाधारण आरोग्य आणि पोषक आहार यासंबंधीच्या गोष्टीची अधिक चांगली काळजी घेऊ शकतील अशा प्रकारे त्यांची क्षमता वाढविणे.
    5. बाल विकासास चालना मिळावी म्हणुन विविध खात्यांमध्ये धोरण अंमल बजावणी याबाबतीत प्रभावी समन्वय घडवुन आणणे.

    एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील सेवा

    उद्यिष्टे

    1. पुरक पोषण आहार
    2. आरोग्य तपासणी
    3. पोषण आहार आरोग्य
    4. संदर्भ सेवा
    5. लसीकरण
    6. अनौपचारीक शाळा पुर्व शिक्षण
    सदर विभागांतर्गत  एकात्मिक बाल विकास सेवा योजना व महिला व बाल विकास विभाग हे दोन विभाग कार्यरत आहेत. धुळे जिल्हयात सद्यस्थितीत खालील प्रमाणे दहा प्रकल्प कार्यरत आहेत व त्यात एकुण 2024 अंगणवाडी केंद्र आहेत.
    अ.क्र. तालुक्याचे नाव प्रकल्पाचे नाव आदिवासी प्रकल्प बिगर आदिवासी प्रकल्प
    1 धुळे धुळे-1 होय
    2 धुळे-2 होय
    3 धुळे-3 होय
    4 शिंदखेडा शिंदखेडा – 1 होय
    5 शिंदखेडा – 1 होय
    6 शिरपुर शिरपुर – 1 होय
    7 शिरपुर – 2 होय
    8 साक्री साक्री होय
    9 पिंपळनेर होय
    10 दहिवेल होय

    दृष्टी आणि ध्येय

    1. गरोदर महिला, स्तनदा माता व  0 ते 6 वर्ष बालके यांना आरोग्य व पोषण लाभ देऊन ,माता मृत्यु व बाल मृत्यू शुन्य करणे
    2. 0 ते 6 वर्ष बालके यांना लसीकरण ,पुरक पोषण आहार,आरोग्य तपसणी इ.सुविधा देऊन कुपोषणमुक्त व सुदृढ बालकांची पिढी निर्माण करणे.
    3. 3 ते 6 वर्ष बालकांना पुर्व शालेय शिक्षण देऊन त्यांचा शैक्षणिक पाया मजबुत करणे.
    4. किशोरी मुली व महिला यांना आरोग्य व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविणे.

    उद्दिष्टे आणि कार्ये

    1. बालकांच्या योग्य मानसिक, शारीरीक व सामाजिक विकासासाठी पाया घालणे
    2. सहा वर्षाखालील वयाच्या बालकांना पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवुन  आणणे.
    1. मृत्यु, मानसिक असंतुलन, कुपोषण आणि शाळा सोडणाऱ्या बालकांच्या संख्येत घट   घडवून आणणे.
    1. बालविकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरणाची निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी ताळमेळ कायम ठेवणे.
    1. योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याव्दारे बालकांचे सामान्य आरोग्य व

         पोषणयुक्त आवशक्यते बाबत काळजी घेण्यासाठी  मातांना सक्षम व योग्य बनविणे.

    1. ३ वर्षे ते ६ वर्षे बालकांना अंगणवाडीत पुर्व शालेय शिक्षण देणे.

    संपर्क

    मेल आय.डी.- dyceo.icdsdhule@gmail.com

    कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक – 02562 (229997)

    विभाग प्रमुखाचे पदनाम जिल्हा कार्यक्रम अधिकारी (.बा.वि.) जि..धुळे

    विभाग प्रमुखाचे नाव श्री.अजय रमेशराव फडोळ

    कार्यालयीन कामकाजाची वेळ

    कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी -9.45 ते 6.15

    (दुपारी १ ते २ या वेळेत अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी)

    सर्व शनिवार,रविवार व शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया सोडुन