बंद

    माध्यमिक शिक्षण विभाग

    शिक्षण विभाग (माध्यमिक )

    विभाग  प्रमुख:- मनिष मंगला राजाराम पवार

    पदनाम :- शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) जिल्हा परिषद  धुळे

     

    प्रस्तावना

    जिल्हा परिषद  धुळे अंतर्गत ४ तालुके धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा येतात धुळे जिल्ह्यात एकूण ४५३   माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून खाजगी अनुदानित व्यवस्थापनाच्या ३०६ बिगर अल्पसंख्यांक व ३३ अल्पसंख्यांक अशा एकूण ३३९ माध्यमिक शाळा, खाजगी अंशत: अनुदानित व्यवस्थापनाच्या ३१ माध्यमिक शाळा, २ म. न. पा. व नगर परिषदेच्या शाळा, २ खाजगी अनुदानित सैनिकी शाळा, ७ खाजगी विना अनुदानित शाळा व ६४ स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावर सुरू असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत.

    बालकांचा मोफत व सक्तीचा  शिक्षणाचा अधिकार अधिनियम  2009 ची प्रभावी अंमलबजावणी केली जाते १०० % विद्यार्थीची पट नोंदणी केली जाते. विद्यार्थीची उपस्थिती वाढविण्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या मध्यामातून नियमित शाळा भेटी व पर्यवेक्षण केले जाते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी दरवर्षी विशेष शोध मोहीम राबवून असे विद्यार्थी आढळल्यास त्यांना वयानुरूप समकक्ष वर्गात दाखल केले जाते. माध्यमिक शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध असल्याबबत RTE Act 2009 नुसार दर ३ वर्षांनी शाळेची मान्यता वर्धित केली जाते. विद्यार्यांना शासनाच्या विविध लाभार्थी योजनांचा लाभ नियमित दिला जातो. शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते.

     

    व्हीजन आणि  मिशन

    कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी संबधित विषयांची संचिका खालीलप्रमाणे सदर करतात

    आस्थापना विषयक बाबी :- विभागातील अधिकारी मार्फत वरिष्ठ आणि ज्यू. अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी  (आस्थापना) अंतिम निर्णय /मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) यांच्याकडे सादर केले जातात

    लेखा विषयक बाबी :-  अधिक्षक, राजपत्रित उपशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत अंतिम मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) यांच्याकडे सादर केले जातात.

    शिक्षण विभागातील विविध पदे :- अधिक्षक, उपशिक्षणाधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक (विस्तार अधिकारी विषय तज्ञ विज्ञान पर्यवेक्षक) आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.

    उद्दिष्टे आणि कार्य :-  शाळा स्तरावरील माहिती /अहवाल प्राप्त करणे व सादर करणे आणि देखरेख करणे त्यांच्या ताब्यातील नोंद अद्ययावत ठेवणे ती संबधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.

     

    उद्दिष्टे आणि कार्य

    १. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची प्रभावी अमलबजावणी करणे.

    २. ११ ते १८ वयोगटातील विद्यार्थीची १०० टक्के पटनोंदणी करणे

    ३. विद्यार्थीची उपस्थिती ९५ टक्के पर्यन्त वाढविणे

    ४. शिक्षण विभाग  (माध्यमिक ) शी निगडीत विविध शासकीय योजणाची प्रभावीपणे     अमलबजावणी करणे.

    ५. विद्यार्थी लाभच्या विविध योजना – मानव विकास कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थी लाभाच्या योजना अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेचा लाभ शाळेपासून २ ते ५ कि. मी. अंतरावरून ये – जा करणाऱ्या इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थीनीसाठी मोफत सायकली योजना ई. योजना

    ६. विद्याथ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन व नियोजन करण्यासाठी शाळांना प्रवृत्त करणे

    ७. मुख्याद्यापक /शिक्षकांच्या सहविचार सभेचे आयोजन करून मार्गदर्शन करणे

    ८. शाळाबाह्ये मुलांचा शोध घेऊन त्यांना वयानुरूप शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.

     

    कार्यालयाचा पत्ता :-

    शिक्षण विभाग  (माध्यमिक )

    जिल्हा कारागृह शेजारी, धुळे 424001

    दूरध्वनी क्रमांक  – 02562 299264

    ईमेल पत्ता- rmsadhule@gmail.com