बंद

    समाज कल्याण विभाग

    प्रस्तावना :-

    • कार्यालयाचे नाव :- समाज कल्याण विभाग
    • पत्ता :- जिल्हा परिषद, धुळे प्रशासकीय इमारत 2 रा मजला धुळे 424001
    • कार्यालय प्रमुख :- जिल्हा समाज कल्याण अधिकारी
    • कार्यक्षेत्र :- जिल्ह्याचे ग्रामिण क्षेत्र
    • विभागाचे प्रमुख कार्य :- ग्रामिण भागातील जनतेस अनु.सूचित जाती,अनु. सूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या  जमाती व नवबौध्दांसाठी विविध कल्याणकारी  योजना राबविणे.

    ध्येय :-

    ग्रामिण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचे जीवनमान उंचविण्यासाठी केंद्रशासन, राज्यशासन तसेच जिल्हा परिषद अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविणे.

    मिशन :-

    1. ग्रामिण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या

              जमाती यांना शेती उपयोगी साहित्ये पुरविणे. उदा. ताडपत्री, पाईप, इलेक्ट्रीक मोटार इ.

    1. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे.
    2. मागसवर्गीय मुला मुलींना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना राबविणे.
    3. इयत्ता 5 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुला मुलींसाठी अनुदानित वसतीगृहात प्रवेश देण्यात येते.

    उद्दिष्टे :-

    1. ग्रामिण क्षेत्रातील अनु. जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुखसुविधा पुर्ण करणेसाठी अशा वस्त्यांमध्ये स्वच्छताविषयक सोयी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पोहोच मार्ग, प्रकाश व्यवस्था, समाज मंदीर इत्यादी व्यवस्था करून स्थिती सुधारण्या संबंधी अनु. जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे ही योजना राबविण्यात येत आहे.
    2. 20% सेस फंड योजनेंतर्गत जिल्हा परिषद आपल्या उत्पन्नाच्या 20% इतकी रक्कम प्रति वर्षी अनु.सूचित जाती, अनु. सूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व नवबौध्दांसाठी राखुन ठेवून सदर रक्कम मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यात येते.
    3. स्वयंसेवी संस्थेमार्फत अनुदानित वसतीगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परिपोषण अनुदान देण्यात येते व वसतीगृहातील कर्मचाऱ्यांना दरमहा मानधन अदा करण्यात येते.
    4. आंतरजातीय विवाहीतांस प्रोत्साहनपर योजने अंतर्गत लाभार्थी जोडप्यांना रक्कम रु. 50000/- लाभ देण्यात येते.
    5. मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजने अंतर्गत इयत्ता 5 वी ते 10 वी मध्ये शिकरणाऱ्या मागासवर्गीय मुला मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करणे
    6. राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजने अंतर्गत लाभार्थी कलावंतांना लाभ देणे.

    प्रशासकीय रचना :-

    Social Welfare

    कर्मचारी व त्यांचे पदनिहाय कर्तव्य
    अ.क्र. पदनाम सेवेचा तपशिल
    1 जिल्हा समाज कल्याण अधिकारी 1.   सर्व योजनेच्या कामकाजावार पर्यवेक्षण करणे.

    2.  आस्थापना विषयक नस्तींवर अभिप्राय देणे.

    3.  प्रथम अपिलीय अधिकारी, म्हणुन कार्य करणे.

    2 कार्यालय अधिक्षक 1.   जन माहिती अधिकारी, म्हणुन कार्य करणे.

    2.  हजेरी पटावर नियंत्रण ठेवणे.

    3.  गोपनिय अहवाल व त्या बाबतचा पत्र व्यवहार करणे.

    4.  कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे मत्ता व दायित्व प्राप्त करणे व जतन करून ठेवणे.

    5.  कार्यालयीन कामकाजावर सनियंत्रण ठेवणे.

    3 सहाय्यक लेखाधिकारी 1.  लेखाविषयक बाबी तपासुन सादर करणे.

    2.  योजना विषयक कामांचे अर्थ संकल्प तयार करणे.

    3.  देयके तपासुन सादर करणे.

    4 वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता 1.  दिव्यांग व्यक्तींना सल्ला व मार्गदर्शन करणे.

    2.  दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळा यामधील कर्मचाऱ्यांचे वेतन देयक तपासून सादर करणे.

    3.  दिव्यांगांच्या वैयक्तीक योजनांचे अर्ज प्राप्त करून तपासून मंजुर करणे.

    4.  योजनांची अर्थसंकल्प तयार करणे.

    5.  दिव्यांगांच्या शाळांना भेटी देणे, नुतनी करणासाठी शिफारस करणे व मुल्यनिर्धारण करणे.

    6.  दिव्यांगाच्या शाळेतील आस्थापनाविषयी कामकाज करणे.

    5 समाज कल्याण निरिक्षक 1.  20% सेस फंड योजनेचे संपुर्ण कामकाज करणे.

    2.  7% वन महसूल योजनेचे संपुर्ण कामकाज करणे.

    3.  समाज कल्याण समितीचे कामकाज करणे.

    6 समाज कल्याण निरिक्षक 1.  अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेचे संपुर्ण कामकाज करणे.
    7 समाज कल्याण निरिक्षक 1.  अनुदानित वसतीगृहाचे संपुर्ण कामकाज करणे.

    2.  राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक व कालावंत मानधन योनजेचे संपुर्ण कामकाज करणे

    8 समाज कल्याण निरिक्षक 1.  आंतरजातीय विवाहितांस प्रोत्साहनपर योजनेचे संपुर्ण कामकाज करणे.

    2.  वसंतवराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेचे संपुर्ण कामकाज करणे.

    3.  महात्मा गांधी व्यसनमुक्ती  सल्ला, उपचार, पुनर्वसन केंद्र,प्रचार व प्रसार योजनेचे संपुर्ण कामकाज करणे.

    9 वरिष्ठ लिपीक 1.  माहिती अधिकार , व आस्थापना विषयक कामकाज करणे.

    2.  आवक जावक कामकाज करणे.

    10 वरिष्ठ लिपीक 1.  मागसवर्गीय मुला मुलींसाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजनेचे संपुर्ण काम करणे.
    11 कनिष्ठ लिपीक 1.  आस्थापना विषयक कामकाज सहाय्यक म्हणुन काम करणे.
    12 शिपाई 1.  कार्यालयीन टपाल वाटप करणे.

    2.  कार्यालयाची साफसफाई व इतर कामे करणे.

    13 शिपाई 1.  कार्यालयीन टपाल वाटप करणे.

    2.  कार्यालयाची साफसफाई व इतर कामे करणे.

     

    माहितीचा अधिकार :-

    १. सहाय्यक जन माहिती अधिकारी

    श्री. मालसिंग वाहऱ्या पावरा

    वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता,

    समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, धुळे

     २. जन माहिती अधिकारी

    श्री. बापू वारू पवार

    कार्यालय अधिक्षक,

    समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, धुळे

     ३.प्रथम अपीलीय अधिकारी,

    श्री. नितीन श्रीराम खंडेराय

    जिल्हा समाज कल्याण अधिकारी

    समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, धुळे

     

    कर्मचारी व त्यांचे पदनिहाय कर्तव्य
    अ.क्र. ई-मेल पत्ता दुरध्वनी
    1 2 3 4
    1 dswozpdhule@gmail.com समाज कल्याण विभाग,  प्रशासकीय इमारत 2 मजला जिल्हा परिषद, धुळे 02562-229470