बंद

    लोकसेवा हक्क अधिनियम

    महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणा-या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला असून तो दि. २८-०४-२०१५ पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उ‍द्दीष्ट आहे.

    वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

    पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुध्द संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व व्दितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिका-यास प्रतिप्रकरण रु.५०००/- पर्यंत दंड होऊ शकतो.

     

    ग्राम विकास व पंचायत राज विभागा मार्फत सेवा हमी कायदा अंतर्गत एकुण ७ प्रकारचे दाखले ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
    अ.क्र सेवा सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी
    जन्म नोंद दाखला ७ दिवस ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    मृत्यू नोंद दाखला ७ दिवस ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    विवाह नोंद दाखला ७ दिवस ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी उप मुख्य कार्यकारी  अधिकारी (पंचायत)
    ग्रामपंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला ५ दिवस ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    नमुना 8 चा उतारा ५ दिवस ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    निराधार असल्याचा दाखला २० दिवस ग्रामसेवक सहायक गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी
    आरोग्य विभाग- महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब सप्टेंबर- 26, 2015 – अनुसुची
    अ.क्र लोकसेवेचे नाव सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) अर्जाचा नमुना व शुल्क पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी
    जननी सुरक्षा योजना प्रसुतीनंतर ७ दिवस जननी सुरक्षा कार्ड वैद्यकिय अधिकारी/अधिक्षक/ शासकिय संस्थाचे ‍अधिकारी ग्रामिण भाग-जिल्हा आरोग्य  अधिकार,  शहरी भाग-जिल्हा शल्यचिकित्सक उपसंचालक आरोग्य सेवा (संबंधीत विभागीय मंडळ)
    जननी ‍शिशु  सुरक्षा योजना ७ दिवस माता बाल संगोपन कार्ड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकिय अधिकारी/ रुग्णालये वैद्यकिय अधिक्षक/जिल्हा रुग्णालये-वरिष्ठ स्त्री रोगतज्ञ ग्रामिण भाग-जिल्हा आरोग्य  अधिकार,  शहरी भाग-जिल्हा शल्यचिकित्सक उपसंचालक आरोग्य सेवा (संबंधीत विभागीय मंडळ)
    वैदयकिय  अधिकाऱ्यांची उपस्थिती  

    दररोज

    मोफत जिल्हा शल्यचिकित्सक( जिल्हा रुग्णालये)/ जिल्हा आरोग्य  अधिकार उपसंचालक आरोग्य सेवा (संबंधीत विभागीय मंडळ) संचालक आरोग्य सेवा

    महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक – वर्ष ५, अंक ११५ (५) बुधवार, ऑगस्ट २१, २०१९/श्रावण ३०, शके १९४१ अन्वये, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, अन्वये खालील नमूद केलेनुसार, सेवा पुरविण्यात येत आहेत.

    महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अन्वये पुरविल्या जाणा-या सेवा – अनुसूची
    अ.क्र सेवा सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) पदनिर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी
    अंगणवाड्यांमध्ये गरोदर महिलांची नाव नोंदणी करणे १ दिवस अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी
    ०६ महिने ते ३ वर्षांपर्यंतच्या मुलांची अंगणवाडीत नोंदणी करणे १ दिवस अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी
    ०३ ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांची अंगणवाडीत नोंदणी करणे १ दिवस अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी
    सबला योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींची नाव नोंदणी करणे १ दिवस अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी
    किशोर शक्ती योजना किशोरवयीन मुलींची नाव नोंदणी करणे १ दिवस अंगणवाडी सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका बाल विकास प्रकल्प अधिकारी
    प्राथमिक शिक्षण विभाग – अनुसूची-अ (विद्यार्थी लाभाच्या सेवा)
    अ.क्र लोकसेवेचे नाव सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) पदनिर्देशित अधिकारी आवश्यक कागदपत्रे/इतर बाबी
    १२ विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतीस्वाक्षरी देणे महाराष्ट्र राज्या बाहेर शिक्षणाकरिता (प्राथमिक शाळांसाठी) 3 दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/ शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/ शिक्षण अधिकारी/तत्सम अधिकारी 1.विद्यार्थी/पालक/शाळा यांचा विनंती अर्ज
    2.शाळा सोडल्याचा मूळ दाखला
    २४ विद्यार्थ्याचे जात/जन्मतारीख/नाव/तत्सम यामध्ये बदल मान्यता आदेश (प्राथमिक शाळा) ७  दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/ शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/ शिक्षण अधिकारी/तत्सम अधिकारी 1.शाळा प्रमुखामार्फत चिहित नमुन्या मधील अर्ज

    2.आवश्यक पुरावे (उदा.जात प्रमाणपत्र/ जन्म दाखला,प्रतिज्ञापत्र,नाव बदल राजपत्र/ तत्सम )

    २८ विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतीस्वाक्षरी देणे महाराष्ट्र राज्या बाहेर शिक्षणाकरिता (प्राथमिक शाळांसाठी) १५ दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/ शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/ शिक्षण अधिकारी/तत्सम अधिकारी
    ३४ विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतीस्वाक्षरी देणे महाराष्ट्र राज्या बाहेर शिक्षणाकरिता (प्राथमिक शाळांसाठी) ३० दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/ शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबईसाठी
    प्राथमिक शिक्षण विभाग – अनुसूची-ब (शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी लाभाच्या सेवा)
    अ.क्र लोकसेवेचे नाव सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस) पदनिर्देशित अधिकारी आवश्यक कागदपत्रे/इतर बाबी
    १४ खाजगी अनुदानित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैद्यकीय खर्चाचे देयकांच्या प्रतिपूर्ती रुपये 2 लाख पर्यंतचे मंजूरीचे आदेश देणे (खाजगी प्राथमिक शाळांसाठी) ७ दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/ शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/ शिक्षण अधिकारी/तत्सम अधिकारी लोकसेवा क्रंमाक 12 प्रमाणे
    ३५ खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता आदेश ३० दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/मनपा क्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी/शिक्षणाधिकारी मनपा/तत्सम अधिकारी 1.शिक्षक शिक्षकेतर पद भरतीस पूर्व परवानगी आदेश 2.पद रिक्त पूरावा 3.संच मान्यता प्रत इ.4.जाहिरात 5.अल्पसंख्याक प्रमाणपत्र लागू असल्यास 6.बिंदुनामावली लागू असल्यास 7.उपस्थिती पत्रक 8.मुलाखत तक्ता/गुणदान तक्ता 9.निवड यादी/गुणवत्ता यादी 10.जातवैधता प्रमाणपत्र लागू असल्यास 11.शैक्षणिक/व्यावसायिक अर्हता 12.संस्था/शाळा समिती ठराव 13.नियुक्ती आदेश 14.रुजू अहवाल
    ३८ खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीस मान्यता आदेश देणे १५ दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/(शिक्षण अधिकारी)/ तत्सम अधिकारी 1.संच मान्यता 2. पद रिक्त असल्याचा पुरावा 3.प्रमाणित बिंदू नामावली लागू असल्यास 4.सेवाजेष्ठता यादी 5.शिक्षक पदी वैयक्तिक मान्यता आदेश प्रत 6.शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्रे 7.संस्था ठराव 8.पदोन्नती आदेश 9.रुजू अहवाल 10.अल्पसंख्याक प्रमाणपत्र लागू असल्यास
    ४० खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची वरिष्ठ श्रेणी मंजुरी आदेश १५ दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/(शिक्षण अधिकारी)/ तत्सम अधिकारी 1.विहित नमुन्यातील प्रपत्र 2.संस्था ठराव/शाळा समिती ठराव 3.सेवाखंड असल्याचा आदेश 4.वैयक्तिक मान्यता 5.मागील तीन वर्षांचे गोपनीय अहवाल 6.सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र
    ४१ खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची निवड श्रेणी मंजुरी आदेश १५ दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/(शिक्षण अधिकारी)/ तत्सम अधिकारी 1.विहित नमुन्यातील प्रपत्र 2.संस्था ठराव/शाळा समिती ठराव 3.सेवाखंड असल्याचा आदेश 4.वैयक्तिक मान्यता 5.मागील तीन वर्षांचे गोपनीय अहवाल 6.सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र 7.सेवा ज्येष्ठता यादी (निवडश्रेणी प्राप्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी) 8.वरिष्ठ श्रेणी घेणा-यांची सेवा ज्येष्ठता यादी 9.किमान एक स्तर अधिक शैक्षणिक अर्हता कागदपत्रे
    ४६ खाजगी शाळांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची विनाअनुदानित वरुन अनुदानित पदावर बदलीस मान्यता (प्राथमिक शाळा) ३० दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/(शिक्षण अधिकारी)/तत्सम अधिकारी 1.बदली नियुक्ती आदेश 2.रुजू अहवाल 3.शैक्षणिक/व्यावसायिक अर्हता 4.संस्था/शाळा समिती ठराव 5.सेवापूस्तकाचे पहिल्या पानाची प्रत 6.पद रिक्त पूरावा 7.संच मान्यता प्रत इ. 8.शाळा समिती ठराव 9.विना अनुदानित वैयक्तिक मान्यता आदेश 10.सेवा ज्येष्ठता यादी
    ५३ खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्तीचे इतर लाभ (उदा-भविष्य निर्वाह निधी,रजा रोखीकरण अंशराशीकरण,तत्सम लाभ) १५ दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/(शिक्षण अधिकारी)/ बृहन्मुंबईसाठी शिक्षण निरीक्षक तत्सम अधिकारी 1.महालेखाकार यांचे सेवानिवृत्ती मंजुरी आदेश

    2.विनंती अर्ज 3.अनुषंगिक इतर कागदपत्रे

    ५७ खाजगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेत्तर समायोजन ३० दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/शिक्षण अधिकारी/तत्सम अधिकारी 1.शाळा/संस्था प्रस्ताव 2.सेवा ज्येष्ठता यादी 3.संच मान्यता 4.बिंदु नामावली
    ६० खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक/ शिक्षकेत्तर यांचे बदलीस मान्यता १५ दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/(शिक्षण अधिकारी)/ तत्सम अधिकारी 1.संस्था बदली आदेश 2.रुजू अहवाल 3.यापूर्वीची वैयक्तिक मान्यता किंवा बदली मान्यता आदेश
    ६३ प्राथमिक शाळांमधील प्रभारी मुख्याध्यापक मान्यता ७ दिवस संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/(शिक्षण अधिकारी)/ तत्सम अधिकारी 1.संस्था प्रस्ताव 2.संस्था ठराव 3.प्रभारी नियुक्ती आदेश 4.सेवा ज्येष्ठता यादी 5.शिक्षक पदावरील वैयक्तिक मान्यता
    प्राथमिक शिक्षण विभाग – अनुसूची- क 
    अ.क्र लोकसेवेचे नाव लोकसेवा पुरविणा-या कार्यालयाचे नाव लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा (कार्यालयीन दिवस) पदनिर्देशित अधिकारी
    स्वंयअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा परवानगी,दर्जावाढ देणेकरिता एलओआय (इरादापत्र) चा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक कार्यालय अधिनियम व नियमावलीतील तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतीस्वाक्षरी देणे महाराष्ट्र राज्या बाहेर शिक्षणाकरिता (प्राथमिक शाळांसाठी) शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक कार्यालय अधिनियम व नियमावलीतील तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतीस्वाक्षरी देणे महाराष्ट्र राज्या बाहेर शिक्षणाकरिता (प्राथमिक शाळांसाठी) शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक कार्यालय शासन आदेश/पत्रातील विहित वेळेनुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    शाळा/तुकडयांचे मूल्यांकन प्रस्ताव शासनास सादर करणे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक/प्राथमिक कार्यालय शासन आदेश/पत्रातील विहित वेळेनुसार शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक/ प्राथमिक
    तांत्रिक मान्यता आदेश (जिल्हा परिषद/जिल्हा नियोजन मंडळ,शासनाच्या अन्य विभागाकडून निधी प्राप्त होतो त्या योजनेसाठी तांत्रिक मान्यता देणे) चे प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक कार्यालय 10 दिवस शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    ११ तांत्रिक मान्यता आदेश जिल्हा परिषद/जिल्हा नियोजन मंडळ,शासनाच्या अन्य विभागाकडून निधी प्राप्त होतो त्या योजनेसाठी तांत्रिक मान्यता देणे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक/प्राथमिक कार्यालय 21 दिवस शिक्षण संचालक माधमिक व उच्च माध्यमिक/ प्राथमिक
    १२ खाजगी शाळा मान्यता वर्धित करणे (माध्यमिक/प्राथमिक) शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक कार्यालय 21 दिवस शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    १७ खाजगी शाळा प्रथम मान्यता प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक कार्यालय 21 दिवस शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    १९ शाळेच्या नावातील बदलाची नोंद घेण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक कार्यालय 15 दिवस शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    २१ खाजगी शाळा (प्राथमिक/माध्यमिक) अनुदान टप्पा अनुदान वितरण आदेश निर्गमित करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक कार्यालय शासन निर्णय निर्गमित दिनांकापासून 10 दिवस शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    २३ आर.टी.ई नमूना-2 मध्ये शाळा मान्यता देणे शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालय अधिसूचना 2011 मधील नियम 11 च्या तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक
    २४ वेतनेत्तर अनुदान मंजुरी आदेश व वेतनेत्तर अनुदान वितरित करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक कार्यालय संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/ शहरी भागासाठी प्रशासन अधिकारी/ शिक्षण अधिकारी/तत्सम अधिकारी शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    २५ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुदान निर्धारण करणे शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालय दरवर्षी मे,जुन शिक्षणाधिकारी प्राथमिक
    २७ खाजगी शाळा अनुदान निर्धारण आदेश निर्गमित करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक कार्यालय दरवर्षी मे,जुन 1.विद्यार्थी/पालक/शाळा यांचा विनंती अर्ज
    2.शाळा सोडल्याचा मूळ दाखला
    २८ सेमी इंग्लिश माध्यमातून (गणित व विज्ञान विषय इंग्लिश माध्यमातून) अध्ययन करण्याच्या मान्यतेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक कार्यालय 15 दिवस 1.विद्यार्थी/पालक/शाळा यांचा विनंती अर्ज
    2.शाळा सोडल्याचा मूळ दाखला
    ३० अनुदानित शाळा माध्यम बदल मान्यता व शाळा प्रकार बदल-(मुले/मुली/सहशिक्षण) मान्यतेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक कार्यालय 15 दिवस 1.विद्यार्थी/पालक/शाळा यांचा विनंती अर्ज
    2.शाळा सोडल्याचा मूळ दाखला
    ३२ अनुदानित शाळा माध्यम बदल मान्यता व शाळा प्रकार बदल-(मुले/मुली/सहशिक्षण) मान्यतेचा प्रस्ताव विभागीय शिक्षण आयुक्तालयास सादर करणे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक/प्राथमिक 15 दिवस शिक्षण संचालक माधमिक व उच्च माध्यमिक/ प्राथमिक
    ३४ स्वंयअर्थसहाय्यित शाळा माध्यम बदलाचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक कार्यालय 15 दिवस शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    ३६ स्वंयअर्थसहाय्यित शाळा माध्यम बदलाचा प्रस्ताव शासनास सादर करणे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक/प्राथमिक 15 दिवस शिक्षण संचालक माधमिक व उच्च माध्यमिक/ प्राथमिक
    ३७ अतिरिक्त शाखा/विषय/तुकडी मान्यता प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक कार्यालय 15 दिवस शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    ३९ अतिरिक्त शाखा/विषय/तुकडी मान्यता प्रस्ताव शासनास सादर करणे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक/प्राथमिक 15 दिवस शिक्षण संचालक माधमिक व उच्च माध्यमिक/ प्राथमिक
    ४० खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळा मधील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बदलीस मान्यता देणे शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक कार्यालय 15 दिवस शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    ४२ स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना इयत्ता 5 वी,8 वी चा वर्ग जोडणे प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालय 15 दिवस शिक्षणाधिकारी प्राथमिक
    ४४ स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना इयत्ता 5 वी,8 वी चा वर्ग जोडणे प्रस्ताव शासनास सादर करणे शिक्षण संचालक प्राथमिक 15 दिवस शिक्षण संचालक प्राथमिक
    ४५ शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर 25% आर टी ई शुल्क प्रतिपूर्ती अदा करणे शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालय निधी प्राप्त दिनांकापासून 15 दिवस शिक्षणाधिकारी प्राथमिक
    ४६ अल्पसंख्याक शाळेतील नामनिर्देशन पदांची नोंद घेण्याचा प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करणे शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक कार्यालय 15 दिवस शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक
    ४८ नविन शाळांना युडायस क्रंमाक देण्याची कार्यवाही करणे शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालय 15 दिवस शिक्षणाधिकारी प्राथमिक
    ४९ खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची बिंदुनामावली तपासून प्रस्ताव मागासवर्गीय कक्ष,विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविणे शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक कार्यालय 15 दिवस शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक

     

    महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट :- aaplesarkar.mahaonline.gov.in
    महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, नाशिक विभागीय कार्यालय, नाशिक

    आयुक्त :श्रीमती चित्रा कुलकर्णी
    पत्ता :’सिंहगड’, शासकीय विश्रामगृह,गोल्फ क्लब जवळ , नाशिक-४२२ ००२
    दूरध्वनी :०२५३-२९९५०८०
    ई-मेल आयडी :rtsc[dot]nashik[at]gmail[dot]comपदनिर्देशित अधिकारी यांच्याकडून सेवा प्राप्त न झाल्यास अथवा दिलेल्या मुदतीत न मिळाल्यास व प्रथम आणि द्वितीय अपिलात न्याय न मिळाल्यास कायद्याच्या १८(१) नुसार अर्जदार नमुना व्ही मध्ये द्वितीय अर्ज प्राप्त झाल्यापासून ६० दिवसात अपील दाखल करू शकतो.