मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
नागरिकांची सनद
शासकीय सुट्टया २०१३
  

भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला धुळे जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृध्द आहे.प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई रामायण-महाभारत, सुदेशकुमार चरत्रामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंर यादव काळात राजा सेऊणचंद्राच्या नंतर सेऊण देश या नावानेही प्रचलीत होता. महाभारताच्या भिष्म पर्वात विविध प्रदेशांचा गोमता, मंदका, खंडा, विदर्भा व रुपवाहिका असा उल्लेख आढळतो. त्यातील खंडा म्हणजेच खानदेश असा अर्थ पाश्चात्य इतिहासकारांनी लावलेला आहे, तर काही अभ्यासकांच्या मते खानदेशचे पुर्वीचे कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश असे होते. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशात थाळनेरचा दुसरा फारुकी राजा मलिक याला खान ही पदवी बहाल केली होती व त्यावरुन खानदेश असे नाव पडले.

हल्लीच्या धुळे, नंदुररबार व जळगांव या तीन्ही जिल्ह्याचा प्रदेश मध्ययुगीन काळापासून खानदेश नावाने ओळखला जात असे व एकच जिल्हा म्हणून धुळे मुख्यालयापासून कारभार चालत असे. तथापि प्रशासनाच्या दृष्टीने 1906 मध्ये खानदेशचे पुर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन जिल्ह्यात विभाजन झाले.जळगांव जिल्हा पुर्व खानदेश म्हणून तर धुळे जिल्हा पश्चिम खानदेश या नावाने ओळखला जात असे. दिनांक 1.7.98 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होवून धुळे व नंदुरबार असे दोन जिल्हे अस्तित्वात आले. धुळे जिल्हा हा तापी नदीच्या वरच्या खो-यात महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला वसलेला आहे.धुळे जिल्ह्याचे भौगोलीक क्षेत्र 8063 चौ.कि.मी. असून राज्याचे एकुण क्षेत्रापैकी 2.6 टक्के क्षेत्र व्यापलेल्या धुळे जिल्ह्याचा राज्याच्या एकुण क्षेत्रफळाचा विचार करता 19 वा क्रमांक आहे.धुळे जिल्ह्यात राज्याच्या एकुण लोकसंख्येपैकी 1.76 टक्के म्हणजेच 1707947 लोक राहतात. राज्याचा दर चौ.कि.मी ला 314 लोकसंख़्येच्या घनतेच्या तुलनेत जिल्ह्याची दर चौ.कि.मी. ला लोकसंख्येची घनता 212 आहे.जिल्ह्यातील एकुण 681 गावे ( 3 ओसाड गावासंह) 4 तहसिलातील सामूहीक विकास गटात सामावलेली आहेत.जिल्ह्यात 1 महानगरपालिका व 2 नगरपालीका असून नागरीक क्षेत्रातील लोकसंख्या 445885 आहे.तर नागरी लोकसंख्या एकुण लोकसंख्येच्या 26.11 टक्के आहे.

धुळे जिल्ह्याच्या पुर्वेस जळगांव जिल्हा दक्षिणेस नाशिक जिल्हा उत्तरेस मध्यप्रदेशातील नेमाड जिल्हा व पश्चिमेस नंदुरबार जिल्हा आहे.धुळे जिल्हा सर्वसाधारणपणे त्रिकोणी आहे.जिल्ह्यात तापी, पांझरा,बुराई,अरुणावती,अनेर,बोरी,कान व आरु या महत्वाच्या नद्या आहेत. जिल्ह्यात एकुण 551 ग्रामपंचायती असून त्यांची सभासद संख्या 5262 इतकी आहे. जिल्ह्यातील एकुण 4 तहसिल प्रशासन व मुलकी सोईच्या दृष्टीने धुळे व शिरपुर या दोन उपविभागात विभागलेले आहे. धुळे उपविभागात धुळे व साक्री या तहसिलाचा तर शिरपुर उपविभागात शिंदखेडा व शिरपुर या तहसिलांचा समावेश आहे. जिल्हा मुख्यालय धुळे हे मुंबई-आग्रा व नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून राज्याच्या राजधानीपासून 343 कि.मी. आहे.

जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 592 मी.मी. आहे.जिल्ह्यातील जमीन ढोभळ मानाने हलकी, मध्यम प्रतीची व काळी कसदार या 3 प्रकारात मोडते एकुण जमिनीच्या 60 टक्के जमीन हलक्या प्रकाराची , 25 टक्के जमीन मध्यम प्रतीची व 15 टक्के जमीन काळी कसदार अशी जमीनीची ढोबळ प्रतवारी आहे.जिल्ह्यातील प्रमुख उद्योगापैकी कार्यरत असलेली 1 कापड गिरणी, 2 सुत गिरणी, 2 स्टार्च फॅक्टरी इत्यादि प्रकल्प तसेच शिरपुर येथे सोने शुध्दीकरणाच्या कारखाना आहे.जिल्ह्यात 4 कृषि उत्पन्न बाजार समित्या आहेत.जिल्ह्यातील दर हजार पुरुषामागे स्रीयांचे प्रमाण 944 असून ग्रामीण भागासाठी व नागरी भागासाठी हे प्रमाण अनुक्रमे 952 व 921 आहे. जिल्ह्यातील एकुण लोकसंख्येच्या 71.6 टक्के व्यक्ती साक्षर असून साक्षरतेचे प्रमाण ग्रामीण भागात 67.1 टक्के तर नागरी भागात 84.5 टक्के इतके आहे. तसेच पुरुष व स्रीयांचे साक्षरता प्रमाण अनुक्रमे 81.4 टक्के व 61.4 टक्के आहे.

धुळे जिल्ह्यातील एकुण 4 तालुक्यापैकी धुळे व शिंदखेडा हे 2 तालुके बिगर आदिवासी असून साक्री व व शिरपुर हे 2 तालुके अशतः आदिवासी आहेत.च्या जनगणनेनुसार जिल्ह्याच्या एकुण लोकसंख्येपैकी 6.39 टक्के अनुसुचित जातीची लोकसंख्या असून 25.97 टक्के अनुसुचित जमातीची लोकसंख्या आहे.

पुर्वी पश्चिम खानदेश या नावाने ओळखला जाणारा धुळे जिल्हा तापी नदीच्या वरच्या खोऱ्यात महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला पसरलेला आहे.

धुळे जिल्हा 20-38 ते 21-61 उत्तर अक्षांश व 73-50 ते 75-11 पुर्व रेखांश या दरम्यान पसरलेला आहे. धुळे जिल्हयाच्या पुर्वेस जळगांव जिल्हा दक्षीणेस नाशिक जिल्हा उत्तरेस मध्यप्रदेशातील नेमाड जिल्हा व पश्चिम्ोस नंदुरबार जिल्हा आहे. धुळे जिल्हा सर्वसाधारणपणे त्रिवेणी आहे जिल्हयाचे भौगोलिकदृष्टया उंचसखलपणा हवामान पर्जन्य जमीनीच्या प्रतिनुसार दोन विभाग पडतात. समुद्र सपाटीपासुन या जिल्हयाची उंची सुमारे 180 ते 215 मी. आहे.

धुळे जिल्हा राज्याच्या एकुण क्षेत्रापैकी 2.6% क्षेत्र व्यापलेले असुन क्षेत्रफळाचा क्रमवारीत जिल्हयाचे 19 व्या क्रमांकाचे स्थान आहे. धुळे जिल्हयात तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर, बोरी, कान व आरु, या महत्वाच्या नद्या आहेत.

2001 जनगणनेनुसार जिल्हयाचे एकुण लोकसंख्या 17,08,000 एवढी असुन एकुण लोकसंख्येपैकी 12,62,000 लोकांचे ग्रामीण भागात तर 4,46,000 इतक्या लोकांचे शहरी भागात वास्तव्य आहे. धुळे जिल्हाचे विभाजन होवुन नंदुरबार हा नविन जिल्हा निर्माण झाला.



धुळे शहरातील प्रे़क्षणीय स्थळे

अंजानशाह दर्गा
अग्रसेन चौक
  
भीमतीर्थ
हरन्यमाळ चर्च
  
धुळे जिल्हा मध्यवर्ती सह. बॅक
इदगाह मैदान
     
एकविरा देवी मंदीर
    
गोल पोलिस चौकी
गुरु शिष्य मंदीर
      
श्री खुनि गणपती मंदीर
बंगला
    
महादेव मंदीर
राजवाडा
    
समर्थ वागदेवता मंदीर
शिवतीर्थ
     

धुळे तालुका

धुळे तालुका भौगोलीक दृष्टया 1920 चौ.मै. असुन धुळे तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्या सन 2001 च्या जनगणनेनुसार 378300 एवढी असुन तालुक्यात एकुण 168 गावे आहेत. तालुक्यात एकुण 141 ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात एकुण 240 प्राथमिक शाळा आहेत.


शिरपुर तालुका

शिरपुर तालुका धुळे जिल्हयाच्या पश्चिमेस असुन तालुक्यात एकुण 147 गावे असुन लोकसंखा 3,37,553 एवढी आहे. तालुक्यात एकुण 118 ग्रामपंचायती असुन सरासरी पाऊस 587 मि.मि.एवढा होतो. शिरपुर हा अर्धा अदिवासी तालुका आहे.

शिरपुर तालुक्यात एकुण श्रेणी 1 चे 10 गुरांचे दवाखाने असुन श्रेणी -2 चे 4 पशुप्रथमोपचार केंद्र आहेत. तसेच तालुक्यात 8 प्राथमिक आरोग्य केंद्र व 16 उपकेंदें आहेत. त्याच प्रमाणे तालुक्यात 211 प्राथमिक शाळा आहेत.

शिरपुर तालुक्यात 1 साखर कारखाना व 1 सुतगिरणी आहे. शिरपुर तालुका हा सद्या प्रगतशिल तालूका म्हणुन प्रसिध्द आहे.


साक्री तालुका

साक्री तालुका धुळे जिल्हयाच्या पश्चिमेस असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 2,44,100 हेक्टर आहे. तालुक्यात पांझरा,कान इ. महत्वाच्या नदया आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या 2001 च्या जनगनेनुसार 3,63,092 लोकसंख्या आहे.

तालुक्यात एकूण महसुल गावे 227,पाडे 241 असुन ग्रामपंचायत 168 आहेत. तालुक्यात 519 अंगणवाडया आहेत.


शिंदखेडा तालुका

शिंदखेडा तालुका धुळे जिल्हयाच्या उत्तर सरहददीवर असून तालुक्याचे क्षेत्रफळ 1256.10 चौ.कि.मी. आहे.तालुक्यात तापी,बुराई,पांझरा,अमरावती,भोगावती या महत्वाच्या नदया आहे.तालुक्याची एकूण लोकसंख्या 2001 च्या जनगनेनुसार 2,45,081 (ग्रामीण) लोकसंख्या आहे.

सन 2002 - 07 च्या दा.रे.खालील एकूण कुटुंब संख्या 28201 आहेत तालुक्यात एकूण महसुल गावे 142 व ग्रामपंचायत 124 आहेत.
तालुक्यात एकूण 8 प्राथमिक आरोग्य केंद्र,35 उपकेंद्र ,17 पशुसंवर्धन दवाखाने ,1 ग्रामीण रुग्णालय, 1उप जिल्हा रुग्णालय व तालुक्यात 177 अंगणवाडया आहेत.

शिंदखेडया तालुक्यात वार्षिक प्रजन्यमान 2006-07 या वर्षात 1009 मी.मी. पाऊस झाला.तालुक्याचे सरासरी प्रर्जन्यमान 550 मी.मी.आहे.तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 140900 हेक्टर असून त्या पैकी लागवडी योग्य क्षेत्र 120617 ऐवढे आहे.तर 18875 हेक्टर पडीत क्षेत्र आहे.एकूण क्षेत्रफळाच्या सरासरी 25% क्षेत्र बागायती आहे.
तालुक्यात 6 राष्टीय कृत बॅकाच्या 13 शाखा आहेत.तालुक्यात एकूण 158 जि.प.शाळा आहेत व 12 खाजगी प्राथमिक शाळा आहेत.


धुळे जिल्हयाची सर्वसाधारण माहिती

जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र :
8063.11 चौ. कि.मी. ( 2.62 % )
2001 च्या जन गणनेनुसार एकुण लोकसंख्या :
17,08,993 ( 1.76 %)
शहरी लोकसंख्या :
4,45,554 ( 26.07% )
ग्रामीण लोकसंख्या :
12,63,439 ( 73.93%)
अनुसुचित जाती लोकसंख्या :
97,000 ( 5.68 %)
अनुसुचित जमाती लोकसंख़्या :
3,75,000 ( 21.94 %)
2001 च्या जन गणनेनुसार एकुण कुटूंबसंख्या :
3,24,557
ग्रामिण कुटूंब संख्या :
2,44,081 ( 75.20%)
शहरी कुटूंब संख्या :
80,476 ( 24.80%)
97-98 नुसार दादियरेषेखालील एकुण कुटूंबसंख्या :
1,31,000 ( 3.43 %)
जिल्ह्यातील एकुण तालुके :
4
जिल्हातील एकुण पंचायत समित्या :
4
जिल्ह्यातील एकुण जि.प.सदस्य :
54
जिल्ह्यातील एकुण पं.स.सदस्य :
108
जिल्ह्यातील एकूण गावे :
681 ( 1.55 % )
एकुण वस्ती असलेला गांवे :
678
निर्जन असलेली गावे :
3
जिल्ह्यातील एकुण ग्रामपंचायती :
551 ( 1.97 %)
जिल्हयाचे साक्षरतेचे प्रमाण :
71.6 % ( 76.9 %)
पुरुष : 81.4 % ( 86.00 %)
स्त्रीया : 61.4 % ( 67.00 % )
राज्यामध्ये जिल्हयाचा क्रमांक :
26 वा
जिल्ह्यातील हवामान व तापमान :
धुळे जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारण उष्ण व विषम स्वरुपाचे असून, उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून, तापमान सुमारे 38 ते 40 डीग्री सेंटीग्रेड पर्यंत असते.
लागवडी लायक क्षेत्र :
4.45 लक्ष हेक्टर (1.90 %)
वन क्षेत्र :
2.09 लक्ष हेक्टर ( 4 % )
सरासरी पर्जन्यतान :
544 मी.मी. ( 33 % )
प्रमुख पिके :
ज्वारी, बाजरी, कापूस, गहू, हरभरा, भूईमूग
पशु सर्व चिकित्सालय (राज्य) :
1
लघु पशु सर्व चिकित्सालय (राज्य) :
3
फिरता पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी -1 :
1 जि.प.कडे हस्तंतरीत
पशुवैद्यकिय दवाखाने श्रेणी- 1 (जि.प.) :
41
पशुवैद्यकिय दवाखाने श्रेणी- 2 (जि.प.) :
32
विभागीय कृत्रिम रेतन केंद्र श्रेणी-2 (राज्य) :
39
सधन कुक्कुट विकास प्रकल्प, धुळे :
1
प्राथमिक आरोग्य केंद्र :
41
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र :
230
100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय :
1 (शिरपूर)
50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय :
1 (दोडाईचा)
अंगणवाडी केंद्र नियमित :
774
नविन मंजूर अंगणवाडी केद :
674
मिनी अंगणवाडी केंद्र :
125
नविन मंजूर मिनी अंगणवाडी केंद्र :
71
प्राथमिक शाळा :
956
खाजगी प्राथमिक शाळा :
192
वस्ती शाळा :
232
महात्मा फुले हमी केंद्र :
83
राजीव गांधी शिक्षणसंधी योजना :
1
आश्रम शाळा (राज्य) विजाभज :
19
अनुदानीत वस्तीगृह :

102

माध्यमिक शाळा :
289
कनिष्ठ महाविद्यालय संख्या :
126
सैनिकी शाळा :
2
हातपंप :
2562
विद्युत पंप :
224