पशुसंवर्धन
विभाग - नाविन्यपुर्ण
योजना
राज्यात
दुधउत्पादनास चालना देणेसाठी ०६ दुधाळ संकरीत गायी / म्हैसगट
वाटप करणे
सदर
योजनेंतर्गत सर्वसाधारण अनुसुचित जाती / अनुसुचित जमातीतील
लाभार्थींना लाभ देण्यात येतो. (सोबत शासन निर्णय जोडण्यात
येत आहे)
शासन निर्णय - शासन निर्णय क्रमांक राज्ययो-२०११/प्र.क्र.६७/पदुम ४, मंत्रालय
विस्तार मुंबई ३२ दिनांक १ जुलै २०११ अन्वये सन २०११-२०१२ या वर्षापासुन सदर योजना
कार्यान्वीत करण्यात आलेली आहे.
योजनेचे
स्वरुप
सदर योजनेंतर्गत सहा (०६) संकरीत गाई / म्हशींचा एक गट वाटप करण्यात येतो. तसेच
यामध्ये जनावरांसाठी गोठा, स्वयंचलीत चारा कटई यंत्र, खाद्य साठवण्यासाठी शेड,
तीन वर्षाचा विमा या बाबींचा समावेश आहे. एकुण गटाची किमत रु ३,३५,१८४/-
देय
अनुदान
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना ६ दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करतांना ५०
टकके अनुदान म्हणजेच रु १,६७,५९२/- तर अनुसुचित जाती / जमातीच्या लाभार्थींना
७५ टक्के म्हणजेच रु २,५१,३८८/- शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
लाभार्थी
निवडीचे निकष
सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसुचित जाती / जमातींच्या लाभार्थ्यांची निवड खालील
प्राधान्यक्रमानुसार करण्यात येते.
- दारिद्रय
रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प
भुधारक शेतकरी (१ हेक्टरपर्यंतचे भुधारक)
- अल्प
भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टरपर्यंतचे भुधारक)
- सुशिक्षीत
बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
- महिला
बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.१ ते ४ मधील)
लाभार्थी
निवड - लाभार्थींची
निवड मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीमार्फत
करण्यात येते.
दुधाळ
जनावरांची खरेदी - खरेदी
समिती मार्फत करण्यात येईल.
योजनेच्या
संक्षीप्त नियम व अटी
- दिलेल्या
१ महिन्याच्या विहित मुदतीत तालुकास्तरावरील पशुधन विकास
अधिकारी (विस्तार) यांचेस्तरावर अर्ज सादर करण्यात यावा.
- अनुसुचित
जाती / जमातीमधील असल्यास जातीचे प्रमाणपत्र सोबत सादर
करण्यात यावे.
- पुरेशी
जागा उपलब्ध असणे आवश्यक सोबत कागदपत्र सादर करण्यात
यावे
- एका
कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल.
- दुध
संकलन मार्गावारील गाव आवश्यक
- दुधाळ
जनावरांची खरेदी शक्यतो राज्याबाहेरुन करण्यात येईल.
- दुधाळ
जनावरांचा ३ वर्षाचा विमा उतरविण्यात येईल.
- प्रथमतः
३ दुधाळ जनावरांचा पुरवठा तदनंतर उर्वरीत दुधाळ जनावरांचा
पुरवठा
- लाभार्थीस
हा व्यवसाय किमान ३ वर्ष करणे आवश्यक
- दुग्धव्यवसाय
प्रशिक्षण घेणे आवश्यक
- दुधाळ
जनावरांच्या खरेदीनंतर जनावरे वाहतुकीचा संपुर्ण खर्च
लाभार्थीने करावयाचा आहे
- योजनेचे
अमंलबजावणी अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी संबंधीत
जिल्हयाचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त.
- तसेच
योजना राबविण्याचे वेळेस बदल झाले असल्यास त्यानुसार
योजना राबविण्यात येईल.
राज्यामध्ये
ठाणबंद पध्दतीने शेळी पालनाद्वारे शेतक-यांना पुरक उत्पन्न
मिळवुन देणे
शासन
निर्णय - शासन निर्णय क्रमांक राज्ययो-२०११/प्र.क्र.७४/पदुम
३, मंत्रालय विस्तार मुंबई ३२ दिनांक २ जुलै २०११ अन्वये
सन २०११-२०१२ या वर्षापासुन सदर योजना कार्यान्वीत करण्यात
आलेली आहे.
योजनेचे
स्वरुप
सदर योजनेंतर्गत सहा (०६) संकरीत गाई / म्हशींचा एक गट वाटप करण्यात येतो. तसेच
यामध्ये शेळी गटाचा विमा, शेळयांचा वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी, आरोग्य सुविधा
व औषधोपचार या बाबींचा समावेश आहे. एकुण गटाची किमत रु ८७,८५७/- (उस्मानाबादी
/ संगमनेरी जातीसाठी)
देय
अनुदान
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना १० शेळया + १ बोकड गट वाटप करतांना ५० टकके
अनुदान म्हणजेच रु ४३,९२९/- (उस्मानाबादी / संगमनेरी जातीसाठी) तर अनुसुचित जाती
/ जमातीच्या लाभार्थींना ७५ टक्के म्हणजेच रु ६५,८९३/- (उस्मानाबादी / संगमनेरी
जातीसाठी) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
लाभार्थी
निवडीचे निकष
- दारिद्रय
रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प
भुधारक शेतकरी (१ हेक्टरपर्यंतचे भुधारक)
- अल्प
भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टरपर्यंतचे भुधारक)
- सुशिक्षीत
बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
- महिला
बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.१ ते ४ मधील)
लाभार्थी
निवड - लाभार्थींची
निवड मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीमार्फत
करण्यात येते.
शेळी गटाची खरेदी - खेरदी समिती मार्फत
करण्यात येईल.
योजनेच्या
संक्षीप्त नियम व अटी
- दिलेल्या
१ महिन्याच्या विहित मुदतीत तालुकास्तरावरील पशुधन विकास
अधिकारी (विस्तार) यांचेस्तरावर अर्ज सादर करण्यात यावा.
- अनुसुचित
जाती / जमातीमधील असल्यास जातीचे प्रमाणपत्र सोबत सादर
करण्यात यावे.
- पुरेशी
जागा उपलब्ध असणे आवश्यक सोबत कागदपत्र सादर करण्यात
यावे
- एका
कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल.
- शेळयांची
खरेदी पुण्यश्लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी
विकास महामंडळाकडुन करण्यात येईन त्यांचे कडे उपलब्ध
नसल्यास शेळयांच्या अधिकृत बाजारातुन करण्यात येईल.
- शेळी
गटाचा ३ वर्षाचा विमा उतरविण्यात येईल.
- वाटप
केलेल्या शेळया मृत झाल्यास विम्याच्या पैशातुन व पशुसंवर्धन
विभागाच्या संमतीने लाभार्थ्यांना दुस-या शेळया खरेदी
करणे आवश्यक.
- लाभार्थीस
हा व्यवसाय किमान ३ वर्ष करणे आवश्यक
- लाभार्थ्याने
शेळी / मेढी पालन विषयक प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील.
- शेळी
गट खरेदीनंतर वाहतुकीचा संपुर्ण खर्च लाभार्थीने करावयाचा
आहे
- योजनेचे
अमंलबजावणी अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी संबंधीत
जिल्हयाचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त.
- तसेच
योजना राबविण्याचे वेळेस बदल झाले असल्यास त्यानुसार
योजना राबविण्यात येईल.
कामधेनु
दत्तक ग्राम योजना
शासन
निर्णय - शासन निर्णय क्रमांक नापुयो-२०१० / प्र.क्र.५०/पदुम
४ मंत्रालय मुंबई ३२ दिनांक २९ आक्टोंबर २०१० अन्वये सन
२०१०-२०११ या वर्षापासुन सदर योजना कार्यान्वीत करण्यात
आलेली आहे.
योजनेचे
स्वरुप -
या योजनेंतर्गत जनावरांना जंतनाशक औषधी पाजणे, गोचिड गोमाशा निर्मुलन कार्यक्रम,
निकृष्ठ चारा सकस करण्यासाठी प्रात्याक्षीकांचे आयोजन, दुग्ध स्पर्धेचे आयोजन,
लसीकरण शिबीर, वंध्यत्व निवारण शिबीरे, रक्तजल नमुने तपासणी इ. कार्यक्रम एकत्रितरित्या
दत्तक गावामध्ये मोहिम स्वरुपात
राबविण्यात येतात.
दत्तक
ग्राम निवडीचे निकष
-
- निवड
करावायाचे दत्तक ग्राम अस्तित्वातील अथवा प्रस्तावीत
दुध संकलन केंद्राचे (खाजगी डेअरी / सहकारी दुध संस्था
/ शासकीय दुध संस्था इ.मार्फत संचलित) मार्गावरील असावे.
- पैदासक्षम
गाई / म्हशींची संख्या किमान ३०० असावी
- दुधाळ
जनावरांची संख्या सर्वात जास्त असेल त्या गावास प्राधान्य.
- गावाचे
सरपंच व ग्रामसेवक तसेच दुध संकलन केंद्र / सहकारी दुग्ध
संस्थांचे पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग मिळत असलेल्या
गावांना प्रथम प्राधान्य.
- दत्तक
ग्रामची निवड सनियंत्रण समिती मार्फत करण्यात येते.
योजनेच्या
अंमलबजावणीची रुपरेषा -
निवड झालेल्या दत्तक गांवामध्ये खालील टप्पेनिहाय योजना राबविण्यात येईल.
- अद्ययावत
पशुगणना
- पशुपालक
मंडळ स्थापन करणे व सहलीचे आयोजन करणे
- ग्रामस्तरावर
सभेचे आयोजन करणे
- जंतनाशन
शिबीरांचे आयोजन करणे
- गोचिड
गोमाशा निर्मुलन शिबीर आयोजन
- रोगप्रतिबंधक
लसिकरण
- खनिजद्रव्ये
मिश्रण व जिवनसत्व पुरवठा
- वंध्यत्व
निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन
- निकृष्ट
चारा सकस करणे
- दुग्ध
स्पर्धेचे आयोजन
- विशेष
ग्रामसभा क्रमांक २ चे आयोजन
- पाठपुरावा
व वंध्यत्व निदान व औषधोपचार शिबीर आयोजन
- विशेष
ग्रामसभा क्रमांक ३ चे आयोजन
- वंध्यत्व
निदान व औषधोपचार शिबीर क्रमांक ३ चे आयोजन
- नाविन्यपुर्ण
उपक्रम राबविणे
- जनावरांचे
मलमुत्र व वाया गेलेल्या चा-याचे खत व्यवस्थापन करणे, प्रशिक्षण व प्रात्याक्षीके
- योजनेचा
प्रगती अहवाल तयार करणे