मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
नागरिकांची सनद
शासकीय सुट्टया २०१३
  
  



आधुनिक भारताच्या निर्मीती मध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे.

बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करुन घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केलेली आहे.

त्यास अनुसरुन महाराष्ट्र शासनाने 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रितीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली.

धुळे,नंदुरबार व जळगांव या तीन्ही जिल्ह्याचा प्रदेश मध्ययुगीन काळापासून खानदेश नावाने ओळखला जात असे व एकच जिल्हा म्हणून धुळे मुख्यालयापासून कारभार चालत असे. तथापि प्रशासनाच्या दृष्टीने 1906 मध्ये खानदेशचे पुर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन जिल्ह्यात विभाजन झाले.जळगांव जिल्हा पुर्व खानदेश म्हणून तर धुळे जिल्हा पश्चिम खानदेश या नावाने ओळखला जात असे.

दिनांक 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होवून धुळे व नंदुरबार असे दोन जिल्हे अस्तित्वात आले. धुळे जिल्हा हा तापी नदीच्या वरच्या खो-यात महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला वसलेला आहे.धुळे जिल्ह्याचे भौगोलीक क्षेत्र 8063 चौ.कि.मी. असून राज्याचे एकुण क्षेत्रापैकी 2.6 टक्के क्षेत्र व्यापलेल्या धुळे जिल्ह्याचा राज्याच्या एकुण क्षेत्रफळाचा विचार करता 19 वा क्रमांक आहे.धुळे जिल्ह्यात राज्याच्या एकुण लोकसंख्येपैकी 1.76 टक्के म्हणजेच 1707947 लोक राहतात. राज्याचा दर चौ.कि.मी ला 314 लोकसंख़्येच्या घनतेच्या तुलनेत जिल्ह्याची दर चौ.कि.मी. ला लोकसंख्येची घनता 212 आहे.जिल्ह्यातील एकुण 681 गावे ( 3 ओसाड गावासंह) 4 तहसिलातील सामूहीक विकास गटात सामावलेली आहेत.जिल्ह्यात 1 महानगरपालिका व 2 नगरपालीका असून नागरीक क्षेत्रातील लोकसंख्या 445885 आहे.तर नागरी लोकसंख्या एकुण लोकसंख्येच्या 26.11 टक्के आहे.

धुळे जिल्ह्याच्या पुर्वेस जळगांव जिल्हा दक्षिणेस नाशिक जिल्हा उत्तरेस मध्यप्रदेशातील नेमाड जिल्हा व पश्चिमेस नंदुरबार जिल्हा आहे.धुळे जिल्हा सर्वसाधारणपणे त्रिकोणी आहे. जिल्ह्यात तापी, पांझरा,बुराई,अरुणावती,अनेर,बोरी,कान व आरु या महत्वाच्या नद्या आहेत. जिल्ह्यात एकुण 551 ग्रामपंचायती असून त्यांची सभासद संख्या 5262 इतकी आहे. जिल्ह्यातील एकुण 4 तहसिल प्रशासन व मुलकी सोईच्या दृष्टीने धुळे व शिरपुर या दोन उपविभागात विभागलेले आहे. धुळे उपविभागात धुळे व साक्री या तहसिलाचा तर शिरपुर उपविभागात शिंदखेडा व शिरपुर या तहसिलांचा समावेश आहे. जिल्हा मुख्यालय धुळे हे मुंबई-आग्रा व नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून राज्याच्या राजधानीपासून 343 कि.मी. आहे.