बंद

    कृषि विभाग

    प्रस्तावना : –

    भारत हा कृषि प्रधान  देश आहे.या देशातील महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागात धुळे जिल्हा आहे.जिल्हयातील ग्रामीण भागातील शेतक-यांचे  कृषि विषयक उत्पन्‍नात वाढ व्हावी या साठी शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान ,सुधारीत बी-बीयाणे, खते, औजारे, इ. बाबी शेतक-यांना  डीबीटी तत्वावर उपलब्ध करुन देणे तसेच या बाबींची शेतक-यांमध्ये जागृकता निर्माण करणे या दृष्टीने जिल्हा परिषदच्या, कृषि विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात .तसेच शेतक-यांना आधुनिक शेती ,तंत्रज्ञानाचा वापर करणेबाबत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांचेमार्फत मार्गदर्शन करण्यात येते.शासनामार्फत तसेच जि.प.च्या सेस फंडामधुन कृषि विषयक योजना राबविण्यात येतात.

    कृषि विभाग हा जिल्हा परिषदेचा महत्वाचा विभाग असून कृषि विकास अधिकारी हे कृषि समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. शेतक-यांचा सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कृषि विभागातर्फे करण्यात येते.

    विभागाचे ध्येय :-

    1. जिल्हयातील शेतक-यांच्या आर्थिक्‍ उन्नतीस हातभार लावून त्यांचे राहणीमान उंचावणे.
    2. शेतक-यांना आवश्यक कृषि निविष्ठा पुरवठा व गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे.
    3. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवणे.
    4. आदिवासी शेतक-यांच्या बाबतीत विशेष लक्ष पुरवून त्यांचे आर्थिक्‍ उन्न्तीस हातभार लावून राहणीमान उंचावणे.
    5. शेती क्षेत्रातील मजूरांच्या समस्येवर मात करण्यासाठी यांत्रिकी करणाचा वापर वाढवणे .करीता प्रचार प्रसिध्दी करणे.
    6. जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून जिल्हयातील शेतक-यांसाठी आवश्य्‍क विविध कृषि विषयक योजना प्रभावीपणे राबविणे.

    प्रशासकीय रचना :-

    प्रशासकीय रचना
     

    विभागाची कार्यपध्दती :-

    जिल्हा परिषद,धुळे कृषि विभागामार्फत जिल्हा परिषद सेस निधीतून योजना ,राज्यपुरस्कृत योजना व विविध केंद्रपुरस्कृत योजना राबविल्या जाणा-या विविध योजनांचे स्वरुप ,तरतूद ,राबविण्याची कार्यपध्दती इ.गोष्टी निश्चित केल्या जातात.या विविध योजना राबवितांना संबंधित जिल्हा परिषदेच्या समित्यांची मान्यता /अभिप्राय घेवून योजना राबविल्या जातात. या विभागामार्फत मुख्यत्वेकरुन वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात.

    गट विकास अधिकारी,पंचायत समिती यांचे अधिनस्त्‍ कृषि विस्तार यंत्रणेची म्हणजेच कृषि अधिकारी /विस्तार अधिकारी (कृषि)  यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.गट स्तरावरील या यंत्रणेद्वारे जि.प.सेसफंड अंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारुन पात्र लाभार्थ्यांची निवड कृषि समितीद्वारे करण्यात येते. लाभार्थी स्वत्: साहित्य्‍ खरेदी करतात त्यानंतर थेट लाभ हस्तांतरणचे शासन निर्णयानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना /बिरसामुंडा कृषि क्रांती योजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील योजनेंतर्गत लाभ दिलेल्या घटकांसाठी देय अनुदान लाभार्थ्यांचे आधार संलग्न्‍ बँकेत PFMS व ZPFMS  प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येते.

    जिल्हयातील खते, बियाणे, किटकनाशके या कृषि निविष्ठांचा पुरवठा व गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद ,कृषि विभागात कार्यरत मोहिम अधिकारी व कृषि अधिकारी (सा.) यांचे मार्फत कृषि सेवा केंद्रांची तपासणी केली जाते व शेतक-यांना गुणवत्तापुर्वक बियाणे व खते पुरवठा बाबतची दक्षता घेण्यात येते.

    अर्ज नमुने :-

    लाभार्थी अर्ज, निवड ते अनुदान PFMS  प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यापर्यंतची कार्यवाही ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी पोर्टलद्वारे सन 2020-21 पासून नव्याने सुरु झालेली आहे.

    संपर्क:-

    कृषि विभाग,जिल्हा परिषद,धुळे मुख्यालय इमारत, तळ मजला,धुळे

    स्टेट बँक,धुळे समोर, पिन-424001

    ई मेल- adozpdhule@gmail.com

    adozpdhule@rediffmail.com

    कार्यालयीन कामकाजाची वेळ

    सकाळी 9.45 ते सायं. 6.15

    महिन्यातील शनिवार व रविवार तसेच शासकिय नियमानुसार इतर सार्वजनिक सुटटया सोडून .