जिल्हा पाणी वस्वच्छता मिशन
विभागाबद्दल माहिती
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन हा जिल्हा परिषदेमध्ये एक महत्वाचा विभाग आहे. प्रकल्प संचालक (जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन ) हे या विभागाचे प्रमुख आहेत. वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लॉस्टिक वेस्ट मॅनेजमेंट व स्वच्छतेविषयक विविध विषयावर प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम या विभागामार्फत राबविले जातात.
दृष्टी आणि ध्येय
* वैयक्तिक शौचालय –केंद्र शासनाने 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन योजना सुरु केली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेतून ग्रामपंचायत स्तरावरील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पायाभुत सर्वेक्षणांनुसार पात्र असलेल्या कुटुंबास वैयक्तिक शौचालय प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात येतो. धुळे जिल्हा 02 ऑक्टोंबर २०१८ रोजी हागणदारी मुक्त जिल्हा घोषित करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच स्वच्छतेविषयक जनजागृतीपर कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यत येतात.
* संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान:-
ग्रामस्वच्छता कार्यक्रमाचा मुळ उद्देश ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्याचा आहे. ग्रामीण जनतेस हा कार्यक्रम आपला वाटावा व त्याचे महत्व पटवुन त्यांना उत्स्फूर्त सहभाग मिळावा या दृष्टिकोनातून सनन 2000-2001 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. तसेच सन 2002-03 पासुन स्वच्छतेशी व ग्रामविकासाशी निगडीत एखादया विशिष्ट क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या ग्रामपंचायना तालुका,जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष बक्षिसे देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. सन 2018 – 19 पासुन शासन स्तरावरुन दरवर्षी नव्याने मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात येतात. त्याअनुषंगाने सन 2018-19 पासून संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील उत्कृष्ट प्रभागास व जिल्हा परिषदेतील गटातील स्वच्छता क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायतीस बक्षिस प्रदान करण्यात येत आहे.
* ओडीएफ प्लस– स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत गाव हागणदारी मुक्त अधिक अर्थात ओडीएफ प्लस करणे हे उद्दिष्ट असून आज अखेर जिल्ह्यातील ४७४ गावे ओडीएफ प्लस घोषित करण्यात आली आहे. उर्वरित गावे देखील टप्प्या टप्प्याने ओडीएफ प्लस घोषित करण्यात येणार आहेत. सन २०२४-२५ आर्थिक वर्षात कृती आराखड्यातील २८३ गावांपैकी १२८ आणि पूर्वीची ३४६ अशी एकूण ४७४ गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत.
* गोबरधन प्रकल्प
1) योजनेचे नाव | स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा.2 |
2) योजनेचे स्वरुप | गोबरधन प्रकल्प |
3) योजनेचे उद्दिष्ट | बायोगॅस तयार करणे |
४) लाभाचे स्वरुप/मिळणारे लाभ | जिल्हयांकरिता रु.50 लक्ष |
5) पात्रतेचे/योजनेचे निकष | धुळेजिल्हयांतील बोराडी तालुका शिरपूर येथे प्रकल्प उभारण्यात आला आहे. |
6) आवश्यक कागदपत्रे | 1)जागा उपलब्धते बाबत हमीपत्र.
2) ग्रामसभा/मासिक सभा ठराव. |
7) कार्यानिवत यंत्रणा, संपुर्ण पत्ता व संपर्क क्रमांक | 1) ग्रामपंचायत
2) ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती 3)ग्रामीण पाणी पुरवठा,जिल्हा परिषद धुळे 4 जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,जि.प.धुळे |
8) योजनेच्या अटी व शर्ती | 1) जिल्हा परिषदेच्या मालकीची वा शासकीय जागा असावी.
2) गोबरधन प्रकल्प राबविण्याकरिता पशुधन,गौशाला,पीक कचरा इत्यादी गावपातळीवर उपलब्ध असावे. 3) गोबरधन कक्षामध्ये विद्युत पुरवठा वपाणी हे उपलब्ध असावे. |
* मैला गाळ व्यवस्थापन
1) योजनेचे नाव | स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा.2 |
2) योजनेचे स्वरुप | मैला गाळ व्यवस्थापन |
3) योजनेचे उद्दिष्ट | मैला गाळ व सांडपाण्याचे नियोजन करणे. |
४) लाभाचे स्वरुप/मिळणारे लाभ | प्रति व्यक्ती 230/- रुपये |
5) पात्रतेचे/योजनेचे निकष | तालुक्यातील एक खड्डा व सेप्टिक टॅंक असलेल्या शौचालयांपासून तयार होणाऱ्या मैल्याच्या व्यवस्थापनाकरिता मैला गाळ व्यवस्थापन केंद्र घेता येईल. |
6) आवश्यक कागदपत्रे | 1)जागा उपलब्धते बाबत हमीपत्र.
2) ग्रामसभा/मासिक सभा ठराव |
7) कार्यानिवत यंत्रणा, संपुर्ण पत्ता व संपर्क क्रमांक | 1) ग्रामपंचायत
2) ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती 3) ग्रामीण पाणी पुरवठा,जिल्हा परिषद धुळे 4) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,जि.प.धुळे |
8) योजनेच्या अटी व शर्ती | 1) जिल्हा परिषदेच्या मालकीची वा शासकीय जागा असावी.
2) 500 पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी जागा उपलबधतेनुसार ट्रेचिंग/प्लान्टेंड/अनप्लान्टेंड प्रक्रिया करावी. |
* पाणीगुणवत्तासनियंत्रणव सर्वेक्षण कार्यक्रम :-
पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत वर्षातून दोन वेळा पावसाळ्यापूर्वी (नोव्हेबर ते मे) व पावसाळ्यानंतर (जुन ते ऑक्टोबर) या कालावधीत ग्रामपंचायत अंतर्गत असणा-या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करुन जैविक तपासणीसाठी उपविभागीय प्रयोगशाळेत पाठविण्याचे अभियान राबविण्यात येते. तसेच ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी उपविभागीय प्रयागशाळेत पाठविण्यात येतात.
शाळा, अंगणवाडी , FHTC तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करुन सदर नमुन्यांची FTK संचाद्वारे जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येते.
सदरचे पाणी नमुने जलसुरक्षकांमार्फत WQMIS ॲप या ॲप्लीकेशनद्वारे गोळा करुन उपविभागीय प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात येतात.तसेच, वर्षातून दोन वेळा पावसाळ्यापूर्वी (1 एप्रिल ते 30 एप्रिल) आणि पावसाळ्यानंतर 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येते. सदर सर्वेक्षणानंतर ग्रामपंचायतींना हिरवे, पिवळे किंवा लाल कार्ड वितरित करण्यात येते.
उद्दिष्टये आणि कार्य
- अ. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजना गावपातळीवर राबविल्या जातात.
- आ. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र पुरस्कृत योजनेतून पात्र लाभार्थ्यांना रुपये 12,000/-वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान या विभागामार्फत देण्यात येते. तसेच, सार्वजनिक शौचालय बांधकाम व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गावपातळीवर राबविले जातात.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छतेविषयक विविध विषयांची प्रशिक्षणे व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात.
संलग्न कार्यालये
राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, सी.बी.डी. बेलापुर, नवी मंबई
संपर्क तपशील
प्रकल्प संचालक,
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद धुळे
निर्देशिका
ईमेल पत्ता –nbazpdhule@gmail.com
पत्ता – प्रशासकिय इमारत,जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद धुळे – पीन ४२४००१ ,
फोन नंबर- ०२५६२२२९४२४
नागरिकांच्या विषयी
सेवा
वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिकशौचालय बांधकाम,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, मैलागाळव्यवस्थापन, प्लॉस्टिक वेस्ट मॅनेजमेंट व स्वच्छतेविषयक उपक्रम या विभागामार्फत राबविले जातात.
योजना –
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेतून केंद्र हिस्सा ६०% व राज्य हिस्सा ४०% अनुदान मिळते.
गोबरधन प्रकल्प बोराडी

गोबरधन प्रकल्पातून दररोज साधारणपणे 30 ते ३५ किलो गॅस निर्माण होतो सदरच्या प्रकल्पातून ग्रामपंचायत मधील १६ कुटुंबांना कनेक्शन दिले आहे गोबरधन प्रकल्पाची किंमत रुपये ५० दशलक्ष आहे. वस्तीगृहामधील ८० विद्यार्थ्यांचा दोन्ही वेळचा स्वयंपाक तयार होतो