पशुसंवर्धन विभाग
प्रस्तावना
एैतिहासीक पार्श्वभूमी बघता, राज्यातील पहिला पशुवैदयकिय दवाखाना धुळे व नाशिक येथे 1 एप्रिल 1892 रोजी कार्यान्वित झाला आहे. भारत हा शेतीप्रधान देश असुन भारतात कृषि क्षेत्राशी संबंधीत असा पशुसंवर्धन विभाग आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागास अन्यन्य साधारण महत्व आहे. पशुपालन/दुग्धव्यवसाय हा दुय्यम व्यवसाय न राहता एक प्रमुख व्यवसाय होऊ पाहत असुन पशुसंवर्धनाचे कार्य या विभागामार्फत करण्यात येते. 21 व्या शतकातील शेतकरी पशुपालक व दुग्धव्यावसायिक यांच्यासमोरील आव्हाने लक्षात घेता विभागाची वाटचाल उदयोजकतेच्या दिशेने होणे अपेक्षित आहे. याशिवाय पशुधनाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी पशुपालकाकडील कमी उत्पादीत गाय / म्हैस यांना कृत्रिम रेतन करण्यात येवुन संकरीत पैदास निर्माण करुन दुग्धोत्पादनात वाढ करणे व पशुपालकांची अर्थिक उन्नती करणे, आजारी पशुधनावर वेळेत औषधोपचार करुन मौल्यवान जनावरांचा जिव वाचविणे तसेच निरनिराळया रोगावर प्रतिबंधक लसीकरण करणे, शेतक-यांना / पशुपालकांना तांत्रिकदृष्टया किफायतशिर पशुपालन करणे बाबतचे पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे तसेच पर्यायाने राष्ट्रीय संपत्तीमध्ये वाढ करणे असे प्रमुख उद्देश व ध्येय पशुसंवर्धन विभागाचे आहे.
ध्येय
१ पशुसंवर्धनाच्या सुधारित तंत्रज्ञानाद्वारे पशुधनास आरोग्यविषयक सेवा देणे.
२ पशुपालक ते पशुउद्योजक तयार करणे.
३ जिल्हयामध्ये आर्थिक व पोषणविषयक विकासाची शाश्वती देणे.
मिशन
पशुपालकांचे उत्पन्न्ा दुप्पट करणे. व चांगल्या प्रतीचे प्राणीजन्य्ा प्रथिने उपलब्ध करून देणे. ग्रामिण भागात पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनामार्फत स्वयंरोजगार व रोजगार निर्मीती करून शाश्वत अर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून, उदयोजकता विकास करणे.
उद्दिष्टे आणि कार्ये
- जिल्ह्यातील पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक तांत्रिक सेवा पुरविणे हे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद धुळे या विभागाचे प्रमुख कार्य आहे.
- पशुसंवर्धन विभागाच्या अधिनस्त्ा असलेल्या पशुवैदयकिय दवाखान्यांच्या माध्यमातून दुधाळ जनावरे, शेळी गट वाटप या वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना, पुरक उत्पन्नाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देणे.
- पशुपैदास धोरणांची प्रभावी अंमलबजावणी – कृत्रिम रेतनाव्दारे पशुधनामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून उत्पादकता वाढविणे.
- पशुधनाचे रोगराईपासून संरक्षण करुन जास्त दुध उत्पादन, अंडी उत्पादन, मांस, लोकर ही पशुजन्य उत्पादने वाढविणे.
- पशुधनास लागणाऱ्या वैरण व पशुखाद्याची उपलब्धता वाढविणे.
- पशुधनास लागणाऱ्या लसींची उपलब्धता व लसीकरण करणे.
- प्रसिध्दी व प्रचार कार्यक्रमाअंतर्गत पशुपालकांपर्यंत पशुसंवर्धन विषयक योजनांची माहिती पुरविणे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, धुळे या कार्यालयाची कार्यसूची खालील प्रमाणे
अ.क्र. | कार्यासन /संकलनकर्ता | कार्यसूची विषय |
1 | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी | 1. जिल्हा परिषद पशुवैदयकिय संस्थांच्या तांत्रिक कामकाजाचे पर्यवेक्षण व नियंत्रण करणे.
2. पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती सभेचे आयोजन करणे. 3. वार्षिक कार्यक्रम अंदाजपत्रक सादर करणे. 4. खात्याच्या वरिष्ठ कार्यालयाकडुन वेळोवेळी प्राप्त्ा होणा-या सुचनांप्रमाणे कार्यवाही करणे. 5. योजनांअंतर्गत योजना, योजनेत्त्ार योजना व जिल्हा वार्षिक योजना प्रारूप आराखडा मंजुरीस्त्ाव सादर करणे. |
1 | पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक)
|
1. योजनांतर्गत / योजनेत्तर / जि.प.सेस योजनांचे नियोजन, खरेदी संदर्भात प्रशासकीय / तांत्रिक मान्यतेसाठी नस्ती सादरीकरण, पुरवठा आदेश सादरीकरण, औषध वाटप करणे.
2. खरेदी संदर्भातील देयके तपासून मंजुरीस सादर करणे 3. भावबंद दरकरार संकलन, स्थायी आदेश संचिका अद्यावत करणे 4. पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे इतिवृत्त तयार करणे. 5. तांत्रिक कामकाजावर पर्यवेक्षण / न्यायालयीन कामासाठी संपर्क अधिकारी म्हणून कामकाज पहाणे. 6. माहिती अधिकारी पदाची दायित्वे संकलण 7. पविअ यांच्या मासिक दैनदिन्या मंजुरीसाठी सादर करणे 8. तांत्रिक विभागाशी संबंधित प्रलंबित लेखा परिक्षण परिच्छेदांचे अनुपालन पुर्तता सादर करणे, अभिलेख वर्गीकरण व संगणकीकरण करणे |
1 | पशुधन विकास अधिकारी सकुप्रवि धुळे. | 1. सकुविप्र कार्यालयाचे सर्व तांत्रिक /प्रशासकीय / लेखाविषयक कामकाज, स्थाई आदेश संचिका अद्यावत करणे
2. योजनांतर्गत योजना अंतर्गत तलंगा गट वाटपा योजना संदर्भातील नस्त्यांना प्रशासकीय / तांत्रिक मान्यतासाठी डॉ. ओमप्रकाश शिंदे पविअ सकुविप्र धुळे अति.कार्यभार सादर करणे व योजनेचे नियोजन करणे. 3. सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे 4. राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली पुरस्कृत सहकारी कुक्कुट प्रकल्पासंदर्भात कामकाज 5. प्रलंबित लेखा परिक्षण परिच्छेद व भांडार पडताळणी परिच्छेदाचे अनुपालन पुर्तता सादर करणे, अभिलेख वर्गीकरण व संगणकीकरण करणे.
|
1 | सहाय्यक प्रशासन अधिकरी | 1. म. विभागीय आयुक्त, मुकाअ, उपमुकाअ (साप्रवि) यांचे वार्षिक तपासणीतील शक पुर्तता करणे
2. मा. लोक आयुक्त प्रकरणे, विभागीय चौकशी प्रकरणे, न्यायालयीन केसेस यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे 3. कार्यालयीन शिस्त व वक्तशिरपणाबद्दल कर्मचा-यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे 4. आस्थापना 1 ते 5 संकलनाकडें विषयाच्या संचिका तपासून सादर करणे आस्थापना विषयक कामकाजावर नियंत्रण व निपटारा करणे 5. सहाय्यक माहिती अधिकारी पदाची दायित्वे 6. खातेप्रमुखाच्या वतीने आस्थापना विषयक कामकाजासंबंधी बैठकींना हजर राहून सुचना प्रमाणे संबंधित संकलनाकडे विषयांची पुर्तता करुन घेणे. 7. म. महालेखापाल, पंचायतराज समिती, लोकलेखा समिती, स्थानिक निधी लेखा परिक्षण, अंतर्गत लेखापरिक्षण, वार्षिक भांडारपडताळणी शक निपटारा, नियंत्रण करणे
|
1 |
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासनाचे नाव आस्था-1 अ
|
1.लेखा सहिता नियम 57 मधिल तरतुदीनुसार न.न.4.मधिल किरकोळ खर्चाची नोंद वही,ठेवणे व अद्ययावत करणे.
2.लेखा सेहिता नियम 50.मधिल तरतुदी नुसार न.न.11 धनादेशाची नोंदवही ठेवणे प्राप्त धनादेशाची रक्कम मुदतीत/ विनाविलंब जिल्हा फंडात भरणा करणे. 3. जिल्हास्तर लेखा सेहिता नियम 11.व.26.मधिल तरतुदी नुसार न.न.1.मधिल पावती पुस्तक व धनादेश साठा नोंदवही ठेवणे. 4.जिल्हास्तर व तालुका स्तरावरून ऑनलाईन वेतन देयके एकत्रित करणे व त्या अनुशंगाने पुर्ण जिल्हाचेDCPS/GPF शेडयुल तयार करणे MTR-44 तयार करणे कोषागार कार्यालयात सादर करणे बिलातुन अशासकिय कपातीचा भरण करणे LIC/ZP पतपेढी/GHBA/ अतिप्रदान/इत्यादी 5. प्रमाणके व इतर आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे सुरक्षित ठेवणे. 6. लेखा परीक्षण बाबतचे सर्वप्रकारे कार्यवाही करणे.विभागीय तपासणी शाकचे दप्तर जतन करणे /अहवाल सादर करणे /देयकाना पुर्व लेखा परीक्षण मंजुरीघेणे 7.निरिक्षण टिपणी मुद्ये तसेच लेखा परिक्षण मुदयांची शक पुर्तता सादर करणे. 8.रोखपाल संबंधिचे सर्व /भांडारपाल विषयक सर्व कर्तव्ये पार पाडणे. |
2 |
वरिष्ठ सहाय्यक (मंत्रा) कार्यासनाचे नाव आस्था-1 ब
|
1. सहा. पविअ/ पशुधन पर्यवेक्षक / व्रणोपचारक / परिचर या जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या आस्थापना विषयक सर्व प्रकारची कामे
2. उक्त संवर्गाच्या बिंदु नामावली नोंदवहया अद्यावत ठेवणे 3. सरळ सेवा / पदोन्नती संवर्गातील पदांचे मासिक व त्रैमासिक अहवाल सादर करणे 4. संकलनाशी संबंधीत प्रलंबित लेखा परिक्षण परिच्छांचे अनुपालन पुर्तता सादर करणे, अभिलेख वर्गीकरण व संगणकीकरण करणे, स्थाई आदेश संकलन करणे 5. गट स्तरावरील सपविअ / पं.प / कर्मचारी यांचे मत्ता दायित्व व गोपनीय अहवाल संकलन व जतन करणे 6. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांचेकडील अभ्यासदौ-या संबंधी प्रश्नाची माहिती पुरविणे |
3 |
वरिष्ठ सहाय्यक (मंत्रा) कार्यासनाचे नाव आस्था-2
|
1.पविअ यांची आस्थापना विषयक सर्व कामे, सेवानिवृत्ती सर्व कामे (सामाजिक सुरक्षा, गट विमा योजना, रजा रोखीकरण, कुटुंब निवृत्ती वेतन इ.)
2. पविअ यांची अस्थाई पदे पुढे चालू ठेवणेबाबतचे प्रस्ताव, बदल्यांची माहिती तयार करणे 3. पविअ यांचे भ.नि.नि. परतावा / नापरतावा, प्रवास देयके, वैद्यकीय प्रतिपुर्ती प्रस्ताव मंजुरी घेवून कोषागारास सादर करणे. 4. पविअ यांचे गोपनीय अहवाल, संकलन 5. सर्व पविअ यांचे मासिक वेतन देयके, वेतन व भत्ते फरकांची देयके कोषागारास सादर करणे 6. संकलनाशी सबंधित प्रलंबित लेखा परिक्षण परिच्छेदांचे अनुपालन पुर्तता सादर करणे, अभिलेख वर्गीकरण व संगणकीकरण करणे, स्थाई आदेश संकलन करणे 7. पविअ यांचे वेतन/ प्रवासभत्ते राज्यस्तरीय योजनांचे चारमाही/ आठमाही/ दहामाही अर्थसंकल्पीय अंदापत्रके, मासिक / त्रैमासिक खर्चाचे अहवाल, विनियोजन लेखे सादर करणे, अनुदान निर्धारण करणे बाबत कामे करणे 8. पविअ संबंधी रोखपालाची सर्व कामे, पगाराची विवरणपत्रात/नादेय प्रमाणपत्र तयार करणे, पविअ यांच्या सर्व प्रकारच्या देयकांना पुर्व लेखा परिक्षण मंजुरी घेणेबाबत आवश्यक प्रस्ताव तयार करणे. |
4 | कनिष्ठ सहाय्य्ाक कार्यासनाचे नाव आस्था-3
|
1) मा. सभापती पशुसंवर्धन यांचे कडील वाहने तसेच दूरध्वनी व सादील देयके तयार करणे.
2) जि.प.सं.अ. यांचे कडील वाहनां संबंधी सर्व कामकाज 3) पविअ यांच्या दैनंदिनी मंजूर करणे. 4) विषय समिती सभांचे सर्व कामकाज/सदस्यांचे प्रवासभत्ते इ.व जि.प. कडील स्थायी / सर्वसाधारण सभेचे कामकाज,जि.प. कडील सर्व सभांची माहिती संकलित करुन सादर करणे. 5) सधन कुकुट विकास प्रकल्प कडील देयके तयार करणे व इतर कामकाज करणे.
|
5 | कनिष्ठ सहाय्यक (मंत्रा) कार्यासनाचे नाव आस्था-4
|
1. पशुसंवर्धन विभाग (मुख्यालय) कार्यालयातील व सधन कुकुट विकास प्रकल्प अंतर्गत कार्यरत कर्मचा-यांची आस्थापना विषयक सर्व कामे, सेवार्थ वेतन देयक, भ.नि.नि., वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके, सेवानिवृत्ती विषयी कामे (सामाजिक सरक्षा, गट विमा योजना, रजा रोखीकरण, कुटुंब निवृत्ती वेतन, गोपनिय अहवाल, मत्ता दायीत्व इ.) आस्थापना विषय सर्व मासिक अहवाल सादर करणे 2. मासिक, त्रेमासीक, वार्षिक.अहवाल तयार करणे. 3. विभागीय तपासणी शकाचे दप्तर जतन करणे / अहवाल सादर करणे 4. बायोमॅर्टीक थम रिपोर्ट तयार करणे व दरमहा उपस्थिती अहवाल सादर करणे 5. संकलनाशी संबंधित प्रलंबित लेखा परिक्षण परिच्छेदांचे अनुपालन पुर्तता सादर करणे, अभिलेख वर्गीकरण व संगणकीकरण करणे, स्थाई आदेश संकलन करणे. 6. पशुसंवर्धन विभाग, अभिलेखचे कामकाजास मदत करणे. 7. कार्यालयातील दुरध्वनी, इलेक्ट्रीक देयक, झेरॉक्स देयके, वार्ताहर देयक तयार करणे. 8.संगणीकरणचा वापर करुन Online E-File,पत्रके इ वरिष्ठाना पाठविणे100 % पुर्तता करण्यात आली
|
6 | कनिष्ठ सहाय्यक (मंत्रा) कार्यासनाचे नाव आस्था-5 | 1) आवक/जावक विषयी सर्व कामे
2) अभिलेख कक्ष व संबंधित सर्व कामे 3) माहितीचा अधिकार संबंधी 1 ते 17 बाबींची माहिती सादर करणे व त्या संबंधी मासिक अहवाल साप्रविकडे सादर करणेê. 4) तक्रारी संदर्भात दरमहा माहिती साप्रवि कडे सादर करणे. 5) म. जि.प.सं.अ. यांची आगाउ फिरस्ती व दैनंदिनी तयार करुन सादर करणे. 6) राजीव गांधी गतिमान प्रशासन योजना व यशवंत पंचायतराज अभियान सुंदर माझे कार्यालय सबंधित सर्व अहवाल साप्रविकडे सादर करणे 7) झिरो पेन्डसी अहवाल साप्रविकडे सादर करणे 8) संकलनाशी सबंधीत प्रलंबीत लेखा परिक्षण परिच्छेदांचे अनुपालन पुर्तता सादर करणे, अभिलेख वर्गीकरण करणे, स्थाई आदेश संकलन करणे,
|
7 | पशुधन पर्यवेक्षक कार्यासनाचे नाव तांत्रिक -1 | 1. योजनांतर्गत योजना वार्षिक योजना प्रारुप आराखडा व पुनर्विनियोजन प्रस्ताव तयार करणे, योजनांची मार्गदर्शक तत्वे निर्गमित करणे.
2. योजनांतर्गत योजना / योजनेत्तर योजनांचे चार / आठ / दहामाही अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करणे 3. जिल्हा नियोजन समितीचे कामकाज करणे 4. योजनांचे खर्चाचे मासिक प्रगती अहवाल तयार करणे 5. जि.ग्रा.वि. यंत्रणेकडून मुलभूत सविधा अंतर्गत विविध प्रस्ताव सादर करणे 6. पवैद स्थापना / दर्जावाढ स्थाननिश्चितीचे प्रस्ताव तयार करणे 7. वित्त आयोगाकडील योजनांचे नियोजन व अहवाल सादर करणे 8. संकलनाशी संबंधीत प्रलबित लेखा परिक्षण परिच्छेदांचे अनुपालन पुर्तता सादर करणे अभिलेख वर्गीकरण वसंगणीकरण करणे, स्थाई आदेश संकलन करणे.
|
8 | पशुधन पर्यवेक्षक कार्यासनाचे नाव तांत्रिक -2 | 1जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनां,आदिवासी उपयोजना,आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना ,विशेष घटक योजना, योजनेत्तर योजना , जि.प. सेस योजना औषध,साहित्य व उपकरणे इ.साठी निधी मागणी करणेखरेदी100 % पुर्तता करण्यात आली
2जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनां,आदिवासी उपयोजना,आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना , विशेष घटक योजना ,योजनेत्तर योजना , जि.प. सेस योजनां औषध,साहित्य व उपकरणे इ.संदर्भात प्रशासकीय व तांत्रिक मान्य नस्त्या तयार करणे.100%पुर्तता करण्यात आली 3औषध,साहित्य व उपकरणे खरेदी संदर्भातील देयके तयार करणे100%पुर्तता करण्यात आली 4जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना व आदिवासी उपयोजना वैरण विकास योजना लाभार्थी नियोजन100% पुर्तता करण्यात आली 5जिल्हास्तरीय औषध भांडार सांभाळणे व तालुका औषध वाटप करणे100%पुर्तता करण्यात आली 6औषध खरेदी पुरवठादाराना ZPFM प्रणालीव्दारे देयक अदा करणे.100%पुर्तता करण्यात आली 7औषध खरेदी पुरवठादारांचे GST,TDS कपात करणे.100%पुर्तता करण्यात आली 8औषध खरेदी पुरवठादारांचे 16 No. देणे100 % पुर्तता करण्यात आली 9संकलनाशी संबधित प्रलंबित लेखा परिक्षण परिच्छंदांचे Online प्रणालीव्दारे अनुपालन पुर्तता सादर करणे, अभिलेख वर्गीकरण व संगणकीकरण करणे, स्थायी आदेश संकलन करणे.2019-20 पर्यंत पुर्तता करण्यात आली 10यशवंत जयवंत ठोंबे वाटप जिल्हयाचा एकत्रित मासिक प्रगती अहवाल100 % पुर्तता करण्यात आली 11संगणीकरणचा वापर करुन Online E-File,पत्रके इ वरिष्ठाना पाठविणे100 % पुर्तता करण्यात आली |
9 | पशुधन पर्यवेक्षक कार्यासनाचे नाव तांत्रिक -3 | 1. तांत्रिक कामाचार जिल्हयाचा एकत्रित मासिक प्रगती अहवाल
2. वार्षिक प्रशासन अहवाल (तांत्रिक) तयार करणे 3. तांत्रिक कामाचे तालुक्यास लक्षांक देणे 4. विषाणु/जिवाणुजन्य रोगप्रतिबंध लसमात्राची मासिक/त्रेमासिक / वार्षिक मागणी करणे. प्राप्त लसमात्रा पुरवठ्यानुसार तालुक्यांना वाटप करणे 5.साप्ताहिक साथ रोग अहवाल बर्ड फ्लु रोगाच्या पार्श्वभुमीवर माहिती संकलन 6.पशुगणना संबंधी कामकाज / चारा टंचाई अहवाल 7.कत्तलखाना कामकाज अहवाल/बकरी ईद संबंधी कामकाजाचे नियोजन 8.संस्थानिहाय कृत्रिम रेतन अहवाल 9. पविअ मासिक सभा/ तालुक्याच्या मासिक सभा 10.खातेप्रमखांची दौरा दैनंदिनी / संभाव्य फिरस्ती दैनंदिनी तयार करणे व मंजूरी 11 संकलनाशी संबंधीत प्रलंबित लेखा परिक्षण परिच्छेदांचे अनुपालन पर्तता सादर करणे, अभिलेख वर्गीकरण व संगणकीकरण करणे, स्थाई आदेश संकलन करणे. 12.कार्यालय प्रमुख सोपवतील ते काम तसेच तांत्रिक सभांच्या तारखा लिहीणे
|
पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद धुळे
माहिती अधिकार अधिनियम –२००५ अन्वये पदनिर्देशित अधिकारी यांचे नांवे
दूरध्वनी क्रमांक – ०२५६२-२९५२१४ ईमेल: dahodhule1@gmail.com
*सहाय्यक जन माहिती अधिकारी ५ (२) |
सहाय्यक प्रशासन आधकारी |
*जन माहिती, अधिकारी यांचा हुद्दा ५ (१) | पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक सहाय्यक.) पशुसंवर्धन विभाग जि.प., धुळेदुरध्वनी क्रमांक – ०२५६२-२९५२१४ |
*प्रथम अपिलीय अधिकारी यांचा हुद्दा ५ (१) | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, धुळे दुरध्वनी क्रमांक – ०२५६२-२९५२१४ |
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य व्यक्तीगत लाभाच्या योजनांची माहिती
केंद्र व राज्यस्तरीय योजना
योजनेचे नांव | प्रकल्प स्वरुप बाबनिहाय | प्रकल्प किमंत (रुपये) | अनुदान (टक्के) | योजना अमंलबजावणी अधिकारी | लाभधारक निवडीचे अधिकार | लाभार्थी निवड बाबत निकष (प्राधन्यक्रम) | ||
राष्ट्रिय पशुधन अभियान, उदयोजकता विकास कार्यक्रम | 1) शेळी/मेंढी पालन
2)कुक्कूट हॅचरी 3)वराह पालन
4) मुरघास
|
100+5 (रू.20 लक्ष)ते 500+25 (रू 1कोटी)
1000 पक्षी (50 लक्ष) 50 ते 100 (वराह 30ते 60 लक्ष ) 2 ते 4 टन प्रतीदिन (रू. 1 कोटी) |
50 टक्के | जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त | प्रोजेक्ट अप्रुव्हल कमिटी (PAC) केंद्रशासन | 1. वैयक्तिक लाभार्थी
2. बचतगट 3. शेतकरी उत्पादक कंपनी कलम 8 खाली नोंदणीकृत संस्था. |
||
नाविन्यपुर्ण योजना 2 दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे | 2 संकरीत/देशी गाई / म्हशींचे वाटप, प्रति जनावर किंमत गाय रु.70000/- म्हैस रू. 80000/-
|
गाय गट 156850/- म्हैस गट 179258/- |
सर्वसाधारण 50 टक्के व अनु.जाती व जमातीसाठी 75 टक्के | जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त | जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे अध्यक्षते खालील समिती | 4. महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.2 व 3 मधील)
5. अल्पभुधारक शेतकरी 6. सुशिक्षीत बेरोजगार (रोजगार व स्वंयरोजगार केंद्रात नाव नोंदणी असलेले) |
||
नाविन्यपुर्ण योजना शेळी गट / मेंढी गट वाटप | 10+1 शेळीगटाची किंमत (उस्मानाबादी / संगमनेरी जातीची प्रति शेळी 8000/- व बोकड 10000/-)
|
रु.1,03,545/- | सर्वसाधारण 50 टक्के व अनु.जाती व जमातीसाठी 75 टक्के | जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त | जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे अध्यक्षते खालील समिती | 1. दारिद्ररेषेखालील लाभार्थी
2. अत्यल्पभुधारक शेजकरी 3. अल्पभुधारक शेतकरी 4. सुशिक्षीत बेरोजगार 5. महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.1 ते 4 मधील) |
||
नाविन्यपुर्ण योजना 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे | पक्षीगृह, स्टोअररुम, विद्युतीकरण इ.उपकरणे
खाद्य पाण्याची भांडी ब्रुडर इ.
|
रु.2,25,000/-
|
सर्वसाधारण 50 टक्के व अनु.जाती व जमातीसाठी 75 टक्के | जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त | जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे अध्यक्षते खालील समिती | 1. अत्यल्पभुधारक शेतकरी
2. अल्पभुधारक शेतकरी 3. सुशिक्षीत बेरोजगार 4. महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.1ते 3 मधील) |
||
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना (केवळ भटक्या जमाती “क” साठी) | 20+1 मेंढी गट पायाभुत सोईसुविधेसह, सुधारीत प्रजातीचा नर मेंढा वाटप करणे, मेंढीपालनासाठी पायाभुत सोई सुविधा, मेढी पालनासाठी संतुलीत खाद्य अनुदान | रू. 6000/- ते 3,33,000/- | 75 टक्के | जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
|
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे | केवळ भटक्या जमाती “क” साठी
www.mahamesh.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. |
||
पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरावरील योजना
योजनेचे नांव | प्रकल्प स्वरुप बाबनिहाय | प्रकल्प किमंत (रुपये) | अनुदान (टक्के) | योजना अमंलबजावणी अधिकारी | लाभधारक निवडीचे अधिकार | लाभार्थी निवड बाबत निकष (प्राधन्यक्रम) |
जिल्हास्तरीय अनुसुचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना 2 दुभत्या जनावरांचे गट वाटप | दोन संकरीत /देशी गायींचे वाटप( 70000 रू.प्रती गाय)
किंवा 2 म्हशींचे वाटप (80000 रु.प्रती म्हैस) |
गाय गट 156850/- म्हैस गट 179258/- |
75 टक्के अनुदानावर | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. | जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे अध्यक्षतेखालील समिती | 1. दारिद्ररेषेखालील लाभार्थी
2. अत्यल्पभुधारक शेतकरी 3. अल्पभुधारक शेतकरी 4. सुशिक्षीत बेरोजगार 5. महिला बचत गटातील लाभार्थी
|
अनुसुचित जाती / जमातीच्या लाभार्थींना 10 शेळया व 1 बोकड गट वाटप | 10+1 शेळी गटाची किंमत (उस्मानाबादी / संगमनेरी जातीची प्रति शेळी 8000/- व बोकड 10000/-) व विमा | रु.1,03,545/- | 75 टक्के अनुदानावर | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. | जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे अध्यक्षतेखालील समिती | |
एकात्मीक कुक्कुट विकास योजना (अनु.जमाती) | 8 ते 10 आठवडे वयाच्या 25 तलंगा व 3 नर कुक्कूट गट पुरवठा योजना | रु.10840/- | 50 टक्के स्वहिस्सा मधुन पक्षी निवास व उपकरणे या खर्चाकरीता | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. | जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे अध्यक्षतेखालील समिती | |
वैरण विकासासाठी प्रोत्साहन देणे (सर्वसाधारण व अनु.जमाती) | 100 टक्के अनुदानाने रु.4000 प्रती हेक्टरच्या मर्यादेमध्ये वैरणीचे बियाणे / बहुवार्षीक चारा ठोंब पुरविणे शेतक-याकडे सिंचन सुविधा व दुभती जनावरे असणे आवश्यक | रु 4000/- | 100 अनुदान | जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. | जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे अध्यक्षतेखालील समिती |
ग्रामिण भागात रोजगार निर्मीतीसाठी दुग्धव्यवसाय, अंशत: ठाणबध्द शेळीपालन आणि कुक्कूट पालन व्यवसायास प्रोत्साहन मिळावे हा या योजनेचा हेतु असुन योजनेंतर्गत 30 टक्के महिला व 3 टक्के दिव्यांग लाभार्थींना लाभ देणेत येतो. सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विहीत केलेल्या कालावधीत अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, तसेच नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना यांचेशी संपर्क साधावा.
कार्यालयाचा पत्ता
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
जिल्हा परिषद, धुळे
Email dahodhule1@gmail.com
Phone No. 02562 295214