सामान्य प्रशासन विभाग
प्रस्तावना
सामान्य प्रशासन विभागांतर्गत आस्थापना विषयक कामकाज, कर्मचारींच्या सेवा विषयक बाबी, अनुकंपा विषयक, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे कामकाज, मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, धुळे यांच्या अधिनस्त स्थायी समिती सभा, वार्षिक प्रशासन अहवाल, खातेप्रमुख व पंचायत समितीस्तरावरील सर्व कार्यालय प्रमुख यांच्या बैठका, कर्मचारी प्रशिक्षण, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खात्याकडुन प्राप्त होणा-या संचिकांवर अभिप्राय व योग्य त्या प्रशासकिय कार्यवाहीबाबतचे विवेचन, जनतेकडुन प्राप्त होणा-या तक्रारींबाबत संबंधित विभागाकडे पठविणे व त्यावर सनियंत्रण ठेवणे व संपुर्ण जिल्हा परिषदेच्या आस्थापना विषयक कार्यभार पाहण्यात येतो.
विभागाचे ध्येय
सामान्य प्रशान विभागाच्या आस्थापना विभागामार्फत वर्ग-1, वर्ग-2,वर्ग-3 व वर्ग-4 च्या अधिकारी व कर्मचारी यांचे संपुर्ण आस्थापना विषयक कामकाज, सेवा विषयकबाबी, वेतन व भत्ते याबाबत अनुदान उपलब्ध करुन देणे, सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे, कर्मचा-यांच्या बदल्या, वाहनचालक व वाहनांबाबत प्रशासकिय व अग्रिम मंजुरी, अनुकंपा मधिल प्राप्त उमेदवारांची नियुक्ती तथा प्रकरणांवर अंतिम कार्यवाही करणे, जाहिरात देउन पदभरती करणे, वर्ग-1 ते वर्ग-4 अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकिय देयके मंजुरी इ. त्याचप्रमाणे खातेप्रमुखांकडुन प्राप्त होणा-या संचिकांवर अभिप्राय व योग्य ती प्रशासकिय कार्यवाही व मार्गदर्शनपर अभिप्राय देणे, इ.बाबत सनियंत्रण करण्यात येते तसेच कर्मचारींना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येते.
प्रशासन विभाग मार्फत जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा एकत्रित वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे त्यास संबंधित समितीची मंजुरी घेणे, जिल्हा परिषद सर्व साधारण सभेची मंजुरी घेउन मा.शासन ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांना सादर करणे, कमंचारी यांच्याकडुन प्राप्त होणा-या अपिालांवर निर्णय घेणे, पंचायत राज समितीचे संपुर्ण कामकाज पहाणे, पंचायत राज समिती, स्थानिक निधी लेखा यांचे कडील परिच्छेदांचे अनुपालन करणे, जिल्हा परिषदेच्या वार्षिक दैनंदिणी तयार करणे इ.कामकाज करण्यात येते.
विभागाची कार्यपध्दती
सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत जिल्हा स्तरावरील सर्व खातेप्रमुख व पंचायत समितीस्तरावरील सर्व कार्यालये यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या बैठकांचे आयोजन करणे, तसेच प्रशासकियबाबी सर्व कार्यालयांना अवगत करणे, मा.मंत्री महोदय,मा.सचिव,मा.विभागीय आयुक्त यांच्या बैठकांबाबतची माहिती संकलीत करणे, आचारसंहिता कालावधित काय कार्यवाही करावी याबाबत संपुर्ण माहिती उपलब्ध करुन देणे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियान, राजीव गांधी प्रशासकिय गतिमानता अभियान, विभागस्तरारील बैठकांची माहिती संकलित करणे इ.बाबीचे सनियंत्रण करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे कामकाज पाहणे व सदर सभांच्या इतिवृत्तावर योग्य ती कार्यवाही करणे, इतिवृत्त मंजुरी नंतर जनतेस पहण्यास उपलब्ध करुन देणे,जिल्हा परिषदेच्या समिती सभांच्या कामकाजाबाबत प्रशासकिय नियंत्रण ठेवणे, लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचे मा.जिल्हाधिकारी, धुळे यांच्याकडुन संकलन करुन त्याबाबत खातेप्रमुखांनी केलेल्या कार्यवाहीस प्रसिद्धी देणे. जिल्हा परिषदेच्या विरुद्ध जनतेने अथवा अन्य प्राधिकरणांनी दाखल कलेल्या केसेस बाबत जिल्हा परिषदेच्या वतीने मा.न्यायालयात जिल्हा परिषदेची बाजु मांडणे कामी वकिलांच्या नियुक्ती बाबतचे कामकाज करण्यात येते.
संपर्क:-
सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद धुळे
जिल्हा परिषद,धुळे मुख्यालय इमारत, पहिला मजला, साक्री रोड, गरूड बाग,
स्टेट बँक च्या विरूध्द ,धुळे समोर, पिन-424001
कार्यालय दूरध्वनी क्रं. ०२५६२-२३७१८९
ई मेल- dyceo.gen@gmail.com
कार्यालयीन कामकाजाची वेळ
सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद धुळे,
सकाळी 9.45 ते सायं. 6.15
महिन्यातील शनिवार व रविवार तसेच शासकिय नियमानुसार इतर सार्वजनिक सुटटया सोडून .